• Download App
    मंदिरातील निर्माल्यातून बनवल्या मुर्ती? २१ वर्षीय मुलाची आयडिया! | This 21 year old boy empowered prisoners in recycling Temple waste

    मंदिरातील निर्माल्यातून बनवल्या मुर्ती? २१ वर्षीय मुलाची आयडिया!

    विशेष प्रतिनिधी

    उत्तर प्रदेश- जेवार: कुणाला कशातून प्रेरणा मिळेल हे सांगता येत नाही. आकाश सिंग या तरूण उद्योजकाला तलावात टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यापासून नवीन काहीतरी करावे असे सुचले आहे. उत्तर प्रदेश मधील जेवार जवळील खेड्यात राहणारा मुलगा देवळातील निर्माल्य संकलन करतो व कैद्यांकडून चांगल्या कोरीव वस्तू करून घेतो. तलावात टाकले जाणारे निर्माल्य कमी होण्याबरोबरच कैद्यांना चांगले काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

    This 21 year old boy empowered prisoners in recycling Temple waste

    तो म्हणाला की, तसा मी एक सामान्य विद्यार्थी होतो पण नववी इयत्तेतील सायन्स प्रोजेक्ट हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण ठरला. माझे पहिलेच प्रोजेक्ट सी.बी.एस.इ. फेअर साठी निवडले गेले. बक्षिसंही मिळाली. त्यामुळे मी माझ्या भागात सायन्स फेअर आयोजित करू लागलो. त्याने एक वॉटर स्प्रिंकलर व चालण्यासाठी स्वयंचलित काठी व इतर काही वस्तू बनवल्या आहेत. तो म्हणाला की, मी गुरगाव मधील मानेसर पॉलिटेक्निक एज्युकेशन सोसायटी मधून सिविल इंजिनियर डिप्लोमा कोर्स केला व नंतर स्वतः ची कंपनी काढली.


    ऑक्सिजन तुटवड्यावर भारतीय नौदलाचा परिणामकार उपाय; ‘Oxygen Recycling System’ विकसित, सिलिंडरची क्षमता दुप्पट ते चौपट वाढविण्याचा प्रोटोटाइप


    त्याला निसर्गाची आवड आहे. तो आपल्या गावातील शनि देवळाजवळ झालेल्या तलावाकडे मित्रांसोबत फिरायला जात असे. परंतु देवळातील निर्माल्य वगैरेमुळे होणारे प्रदूषण पाहून त्याने काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी माझ्याकडे असलेल्या वस्तू बनवण्याच्या कल्पनेला मी कैद्यांच्या मदतीने सुरुवात केली. तलावाचे प्रदूषण कमी झाले व कैद्यांनापण भेटण्याची मला संधी मिळाली.

    जीबी नगर जिल्हा जेलमध्ये मी बावीस कैद्यांसह कामाला सुरुवात केली. दिल्ली/एन.सी.आर. मधील १५२ देवळांमधून आम्ही निर्माल्य गोळा करतो व त्यापासून मूर्ती तयार करतो हे काम ३५ कैदी करत आहेत. नंतर त्याच्या लक्षात आले की नारळाच्या साली व राखेपासून पण वस्तू बनवता येतील व त्यानी या साहित्याचा वापर करून मूर्ती व वस्तू बनवण्यास सुरुवात केली. आमच्या या कामामुळे कैद्यांनापण एक चांगले काम मिळाले आहे. ज्यामुळे तुरुंगातून सुटल्यावरही त्यांना त्याचा उपयोग होईल.

    आमच्या एकत्रित मेहनतीचे फळ म्हणून हे यश  आमच्या उद्योगाला मिळाले आहे. तो म्हणाला की,  माझे आई-वडील पण मला या कामाला नेहमी सहकार्य करतात, मी त्यांचा आभारी आहे.

    This 21 year old boy empowered prisoners in recycling Temple waste

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य