विशेष प्रतिनिधी
मध्य प्रदेश: सुरेश केशारी या तरुणाने अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडली व वन्यजीवन फोटोग्राफीत आपले करिअर केले. १९व्या वर्षी त्याला नेचर्स बेस्ट फोटोग्राफी आशिया अॅवार्ड मिळवले. त्याने Smitsonian नॅचरल हिस्ट्री म्युझियम (वॉशिंग्टन डिसी) येथे प्रदर्शन आयोजित केले होते. मध्यप्रदेश मध्ये राहणाऱ्या सुरेश केशारीच्या जीवनातील महत्वाची त्याला हलवून सोडणारी घटना म्हणजे सोलो या वाघीणीचा बांधवगड नॅशनल रिझर्व मधील अनैसर्गिक मृत्यू.
This 19 year old boy left his job for his love of animals and made his own web show
सोलो ही बछडा असल्यापासून ते ती मोठी होईपर्यंतचे बरेच फोटोशूट केले होते. तिची ८ वाघांबरोबरची लढाई हा पण एक महत्त्वाचा भाग होता. त्याने सोशल मीडियावर लिहिले होते की, ती माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाली होती. मी तिच्याबाबतीत शिकत होतो आणि तिच्याकडून शिकत होतो. कोटूंबिक जीवन, एकनिष्ठता, धैर्य, काळजी घेणारी आई, आणि चांगली मुलगी असे तिची अनेक रुपे मी पाहिली.
सफारी विथ सुयश हा कार्यक्रम world wildlife fund for nature ने वितरीत केला होता.
सुयशने फोटोग्राफीचे कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी २०१९ मध्ये त्याने आपल्या या छंदासाठी नोकरी सोडली. सुयशला लहानपणापासून प्राण्यांबद्दल आवड होती. तो डिस्कवरी अॅनिमल प्लॅनेट सारखी चॅनल बघत असे. नंतर त्याला बिअर ग्रिल्स, निगेल मार्व़न, क्रिस पॅक्हम सारख्यांकडून प्रेरणा मिळाली.
पण त्याची सुरुवात मात्र अभयारण्यात इंटर्न म्हणून झाली. हे काम त्याला पगार न मिळता करावे लागले.
मग तो पोलिटिकल सायन्समधील पदवीसाठी अमेरिकेत गेला. मग तो सोशल मिडियावर फोटो पोस्ट करू लागला. त्यावर त्याला प्रतिसाद मिळाल्यावर लोकांना वन्यजीवनात इंटरेस्ट आहे असे त्याच्या लक्षात आले. २०१८ मध्ये बांधवगड नॅशनल रिझर्व मध्ये त्यानी पहिली मालिका केली. नंतर WWF ला त्याचे फोटो आवडले व त्यानी ते रिलीज केले. सोलो वाघीण, अनिधिकृत शिकारी, मानव-प्राणी संघर्ष इ. मालिका केल्या. तसेच साऊथ आफ्रिकेमध्ये पण दोन मालिका केल्या. तो यासाठी तेवीस देशात जाऊन आला आहे. त्याने वाघांचे शुटींग १००- २०० मिटर अंतरावरून पण केले आहे.
२०१८ मध्ये त्याच्या टिमने बांधवगड मध्ये १८ हत्तींपासून शेतांचे फेन्सिंग करून संरक्षण करून त्या हत्तींनाही वाचवले व आता तिथे ५० हत्ती आहेत. वन्य जीव संवर्धनासाठी त्याने सफारी वीथ सुयश हा प्रोजेक्ट चालू केला आहे. सफारी टुर च्या या पॅकेजचा एक वर्षात १०० लोकांनी लाभ घेतला आहे. तो लवकरच स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच करणार आहे. वन्यजीवनावरील हा एक आगळा वेगळा प्रयोग असेल. त्याचे फोटो तुम्ही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर पाहू शकता.
This 19 year old boy left his job for his love of animals and made his own web show
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला