विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अखेर जे घडायची शक्यता वाटत होती, तेच घडणार. केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधून मजबूत आघाडी तयार होण्याऐवजी सत्ताधारी पक्षाविरुद्ध दोन आघाड्या तयार होणार. देशाच्या 75 वर्षांच्या राजकीय इतिहासात हेच घडले आहे. आधी काँग्रेस विरोधात हे घडायचे आणि आता भाजप विरोधात घडते आहे. विरोधकांच्या ऐक्याची चर्चा जोरदार होते पण प्रत्यक्षात मात्र फाटाफूट होते. Third front idea initiated dropping Congress; but who will be their prime ministerial candidate??
आता देखील विरोधी ऐक्याची चर्चा जोरात सुरू असताना प्रत्यक्षात मात्र काँग्रेसला वगळून तिसऱ्याच आघाडीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी या तिसऱ्या आघाडीला चालना दिली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचे राजकीय अस्तित्व धूसर आणि काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे, अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत आणि ते सत्तेवर आहेत. या राज्यांचे प्रमुख आता या तिसऱ्या आघाडीत दिसण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मुख्यमंत्री नितीश कुमार, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमार स्वामी, आदी नेत्यांचा या तिसऱ्या आघाडीत समावेश होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला, दुसऱ्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे नेते नेमके कुठल्या बाजूला असतील याच्या अटकळी सध्या बांधल्या जात आहेत. कारण पवारांपासून स्टॅलिन यांच्यापर्यंत सर्व नेते आज आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडीत आहेत आणि ते अधिकृतरित्या मोदीविरोधात असले तरी 2024 च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्याच बाजूने राहतील याची कोणतीही गॅरंटी नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे भवितव्य देखील काँग्रेस बरोबर काही प्रादेशिक पक्षांना वगळूनच निश्चित होण्याची शक्यता आहे.
पण प्रश्न त्या पलिकडचा आहे. राजीव गांधींच्या काळात विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जसा पुढाकार घेऊन जन मोर्चा त्यानंतर जनता दल अशी राजकीय पक्षांची मोट बांधून काँग्रेसचा पराभव केला होता, तसा तिसऱ्या आघाडीत विश्वनाथ प्रताप सिंह कोण बनणार?? हा प्रश्न आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, के. चंद्रशेखर राव यांची पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यातच द्रमूक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांची महत्त्वाकांक्षा संख्याबळाच्या आधारावर उफाळली, तर त्याला कोण प्रतिबंध घालणार??, हाही प्रश्न आहे. शिवाय गेल्या 32 वर्षांपासून शरद पवारांचे नाव पंतप्रधान पदाच्या चर्चेत आहेत मग वयाच्या 84 व्या वर्षी त्यांना अखेर ही संधी मिळेल का??, हाही प्रश्न आहे.
1989 मध्ये एक विश्वनाथ प्रताप सिंह होते. त्यामुळे ते तिसरी आघाडी अथवा जन मोर्चा काही अंशी यशस्वी करू शकले. पण त्या वेळेलाही त्यांना भाजपची आणि कम्युनिस्टांची मदत घ्यावी लागली होती. 2024 साठीच्या या संभाव्य तिसऱ्या आघाडीत तीन-चार विश्वनाथ प्रतापसिंह आहेत मग काँग्रेसला वगळून ते यशस्वी होतील??
Third front idea initiated dropping Congress; but who will be their prime ministerial candidate??
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी केले भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन
- Balaghat Plane Crash : मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; पायलट आणि को-पायलट ठार
- न्यायव्यवस्थेवर सरकारचा कोणताही दबाव नाही; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले
- महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युतीत जागावाटपाच्या अद्याप चर्चाही नाहीत, पण माध्यमांनी ठिणग्या टाकून पेटवले वणवे!!