• Download App
    "ते" इमानदार व्यक्तीला फार काळ रोखू शकणार नाहीत; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कन्येचे काँग्रेस हायकमांडला आव्हान!!They” can’t stop an honest person for long; Navjot Singh Sidhu's daughter challenges Congress High Command

    “ते” इमानदार व्यक्तीला फार काळ रोखू शकणार नाहीत; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कन्येचे काँग्रेस हायकमांडला आव्हान!!

    वृत्तसंस्था

    अमृतसर : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची कन्या राबिया सिद्धू ही आपले पिताजी विधानसभेचे निवडणूक असल्याशिवाय लग्न करणार नाही, या संदर्भातल्या बातम्या सर्वत्र आल्या आहेत.They” can’t stop an honest person for long; Navjot Singh Sidhu’s daughter challenges Congress High Command

    पण तिने त्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या हायकमांडला आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी यांना पसंती दिली. जे पंजाबचे मत आहे, तेच माझे मत आहे. त्यामुळे चरणजीत सिंग चन्नी हेच काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी जाहीर केले.



    या मुद्द्यावर नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेस हायकमांडवर नाराज झाले आहेत. त्यांनी दोन वेळा काँग्रेस हायकमांड विरोधात वक्तव्येही केली आहेत. आज त्यांच्याच पावलावर पुढचे पाऊल टाकत राबिया सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांड आव्हान दिले आहे. काँग्रेस हायकमांडने जो निर्णय घेतला, ती त्यांची मजबुरी असेल. परंतु मी एवढेच म्हणू शकते की कोणीही एखाद्या इमानदार व्यक्तीला फार काळ रोखून धरू शकत नाही आणि बेईमान व्यक्तीला एक ना एक दिवस थांबावेच लागते. किंवा काळ त्याला रोखून धरतो, अशी खोचक टिप्पणी राबिया सिद्धू यांनी केली आहे.

    नवज्योत सिंग सिद्धू सध्या वैष्णो देवीच्या दर्शनाला गेले आहेत. त्यामुळे अमृतसर पूर्व या त्यांच्या मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी त्यांची पत्नी डॉक्टर नवज्योत कौर सिद्धू आणि कन्या राबिया सिद्धू या दोघी सांभाळत आहेत. याच प्रचाराच्या दरम्यान राबिया सिद्धू यांनी वर उल्लेख केलेले वक्तव्य करून काँग्रेस हायकमांडला आव्हान दिले आहे.

    They” can’t stop an honest person for long; Navjot Singh Sidhu’s daughter challenges Congress High Command

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये ओली-प्रचंड आणि देउबा यांच्या पक्षांमध्ये युती शक्य; जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू

    Rahul Gandhi : अमित शहांवर आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स; सुलतानपूर न्यायालयाने सांगितले- 19 जानेवारीला हजर व्हा

    RBI May : 2026 मध्ये व्याजदर 0.50% ने आणखी कमी होऊ शकतो; 2025 मध्ये 1.25% कपातीनंतरही आरबीआयकडे वाव