• Download App
    मुलायम सिंग यादव यांच्या परिवारात आता होणार एकी, काका शिवपालसिंह यांच्याशी अखिलेश याद करणार युती|There will be unity in Mulayam Singh Yadav's family now, Akhileshis ready to alliance with his uncle Shivpal Singh

    मुलायमसिंह यादव यांच्या परिवारात आता होणार एकी; काका शिवपालांशी अखिलेश यादव करणार युती

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या परिवारात आता एकी होणार आहे. काका शिवपालसिंह यादव यांच्याशी युती करण्याची तयारी अखिलेश यादव यांनी दाखविली आहे.There will be unity in Mulayam Singh Yadav’s family now, Akhileshis ready to alliance with his uncle Shivpal Singh

    अखिलेश यादव यांना आपले काका शिवपाल सिंह यांच्यासोबत युती करण्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, सगळ्याच छोट्या पक्षांना सोबत घेतलं जाईल. काकांचाही एक पक्ष आहे. तोही सोबत घेण्याचे प्रयत्न केले जातील. काकांना योग्य तो मान दिला जाईल. समाजवादी पक्षाचे लोक त्यांना अधिकाधिक मान देतील. निवडणुकीत त्यांनाही सोबत घेण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील.



    अखिलेश यादव म्हणाले, भाजपा द्वेषाचं राजकारण करत आहे. ते फक्त याच शोधात आहेत की कधी एखादा नवा मुद्दा मिळतोय. भाजपावाले विकास, रोजगार याबद्दल बोलतच नाहीत. अखिलेश यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यासंदभार्ने ते बोलले. अखिलेश पूर्वी म्हणाले होते,

    सरदार पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, बॅरिस्टर जिन्ना हे सगळे एकाच संस्थेत शिकून आले होते. एकत्रच शिकून बॅरिस्टर झाले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांना कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी ते मागे हटले नाहीत.

    There will be unity in Mulayam Singh Yadav’s family now, Akhileshis ready to alliance with his uncle Shivpal Singh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही