वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मंगळवारी राजधानीत हंगामातील सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असून आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची आशा नाही. तापमान आणखी वाढेल आणि बुधवारी ते ४० अंशांवर जाऊ शकते. There will be three days of intense heat wave in Delhi
यंदा मार्चमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे उष्मा वाढला आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दिल्लीत साधारणपणे मार्च महिन्यात सरासरी १५.९ मिमी पाऊस पडतो. गेल्या वर्षी ३० मार्च रोजी तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, जे गेल्या १३ वर्षांतील सर्वोच्च तापमान आहे.
हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र जेनामानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिल्लीतील काही भागात उष्णतेची लाट होती. राष्ट्रीय राजधानीतील सफदरजंग येथील अधिकृत तापमान निर्देशांक वेधशाळेने कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदवले. ते हंगामाच्या सरासरीपेक्षा सात अंशांनी जास्त आहे. त्याच वेळी, किमान तापमान १८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ते सामान्यपेक्षा एक जास्त आहे. तर आर्द्रतेची पातळी ७९ ते १४ टक्क्यांच्या दरम्यान होती.
पठारी भागात जेव्हा तापमान ४० अंशांच्या वर पोहोचते. सामान्यपेक्षा ४.५ अंश जास्त असते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली जाते. नरेला सर्वात उष्ण क्षेत्र होते. दिल्लीच्या बाहेरील नरेला हे ४१.७ अंशांसह सर्वात उष्ण होते. त्याच वेळी, पीतमपुरा येथे ४१.४ लोधी गार्डन ४०.१ रिज येथे ४०.२ होते. गुरुग्राममध्ये ४०.८ आणि फरिदाबादमध्ये ४०.७ अंश कमाल तापमान होते.
एप्रिलपूर्वी पारा वाढण्याची शक्यता असून उत्तर भारतातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की ईशान्य भारताच्या काही भागात पुढील पाच दिवसांत मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३१ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत आसाम-मेघालय आणि अरुणाचल प्रदेशसह पूर्वोत्तर भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. २९ ते ३० मार्च दरम्यान दक्षिण हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि जम्मू विभागातील काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते.
There will be three days of intense heat wave in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- पत्रकार राणा अयुब यांना परदेशात जाण्यास बंदी, ईडीने जारी केले ‘लूक आऊट सर्क्युलर’, तपासात सहकार्य करण्याचे निर्देश
- पत्रकार राणा अयूबला लंडनला जाताना मुंबई विमानतळावरच रोखले, कोरोनाच्या नावाखाली
- ओएनजीसी लिमिटेड मधील 1.5% शेअर्स विकून सरकार उभारणार 3 हजार कोटी रुपये
- काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सहारणपूरमधील मौलानांची पत्रकार परिषद, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की
- वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; ऊर्जा मंत्र्यांसमवेत सकारात्मक बैठक!!
- Modi – Memon – Pawar : माजिद मेमन यांची मोदींवर स्तुतिसुमने; पण पवारांचे प्रश्न टाळून निघून जाणे!!