विशेष प्रतिनिधी
पानिपत : सन 2024 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना संघाने एक क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरातल्या शाखांची महिलांना जोडून घेण्याचा संघाचा मनसूबा आहे आणि त्याची कार्यवाही होणार आहे. संघाच्या वार्षिक प्रतिनिधी सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती संघाचे प्रवक्ते आणि सहसर कार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.There will be a discussion in the meeting on connecting women with ‘Shakhas’: Dr Manmohan Vaidya, RSS Joint General Secretary on Akhil Bharatiya Pratinidhi Sabha at Panipat
संघाच्या प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक हरियाणातील पानिपत नजीक सामवाल येथे सुरू आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह संघाचे 1400 प्रतिनिधी या वार्षिक सभेत सहभागी झाले आहेत. संघाच्या राष्ट्रव्यापी धोरणासंदर्भात या प्रतिनिधी सभेत चर्चा होणार आहे. संघाची दरवर्षी मार्चमध्ये प्रतिनिधी सभेची बैठक होत असते त्यापैकी हरियाणातील सामवाल पुढे होणारी ही बैठक शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीची आहे.
या पार्श्वभूमीवर संघाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 75000 हून अधिक शाखा आहेत. या सर्व शाखांशी महिलांना जोडून घेण्याचा क्रांतिकारक निर्णय संघाने घेतला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नसल्याचा आरोप नेहमी केला जातो. वास्तविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाठोपाठ काहीच वर्षात राष्ट्रसेविका समिती स्थापन करून तिचे कार्य देखील सुरू झाले आहे. परंतु संघाएवढी राष्ट्रसेविका समितीची प्रसिद्धी नाही. त्याचबरोबर दुर्गा वाहिनीच्या रूपाने देखील संघ परिवारात महिलांचे वेगळे काम सुरूच असते. परंतु दुर्गा वाहिनीची समाज माध्यमांमधील प्रतिमा वेगळी आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या विद्यमान शाखांशी महिलांना जोडून घेणे आणि त्यांना कार्यरत करणे या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय प्रतिनिधी सभेने घेतला आहे. संघाची विविध सेवा कार्ये, विविध उपक्रम यांच्याशी महिलांना संलग्न करून घेण्याचा हा विचार आहे.
राष्ट्रसेविका समिती हा संघ परिवाराचा महत्त्वपूर्ण घटक आहेच. तो वर्षानुवर्षे संघाच्या प्रतिनिधी सभेशी देखील जोडला गेला आहे. संघाचे कार्यक्रम, संघाची विचारसरणी आणि संघाची कार्यपद्धती यांच्याशी राष्ट्रसेविका समिती एकरूप आहे. परंतु समितीच्या कार्याची समाजात फारशी माहिती नाही. त्यामुळे संघात महिलांना स्थान नसल्याचा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर संघातल्या विविध उपक्रमांची सेवा कार्याशी आणि संघातल्या निर्णय प्रक्रियेशी महिलांना जोडून घेण्याचे संघाने ठरविले आहे.
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 1924 पासून 1925 पर्यंत संघाचे स्थापना शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षात संघ आपल्या विविध उपक्रमांचे विस्तारीकरण करण्याच्या तयारीत आहे. महिलांना शाखांशी जोडून घेणे हा त्यातलाच एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे.
There will be a discussion in the meeting on connecting women with ‘Shakhas’: Dr Manmohan Vaidya, RSS Joint General Secretary on Akhil Bharatiya Pratinidhi Sabha at Panipat
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने क्रीडा तज्ज्ञाला काढून टाकले, भारताचा सवाल- ही कसली पत्रकारिता?
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही
- हैदराबादेत पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज CISF स्थापना दिन परेडमध्ये होणार सहभागी
- P.M.मोदींचे सानिया मिर्झाला पत्र, इतर खेळाडूंना मिळाले इन्स्पिरेशन!