Tuesday, 6 May 2025
  • Download App
    ‘’भारतात कोणत्याही धर्माला धोका नाही, दहशतवादाला...’’ अजित डोवाल यांचे विधान!There is no threat to any religion in India terrorism has no religion Ajit Dovals statement

    ‘’भारतात कोणत्याही धर्माला धोका नाही, दहशतवादाला…’’ अजित डोवाल यांचे विधान!

    मुस्लीम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस आणि सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांची घेतली भेट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज मुस्लीम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस आणि सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांची भेट घेतली. यावेळी अजित डोवाल म्हणाले, “भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी ठरला आहे. देशाला 2008 (मुंबई हल्ला) सह अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. भारत आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे आणि दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी इतर देशांना सहकार्य करण्यासह विविध माध्यमांद्वारे दहशतवादाशी लढण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.’’ There is no threat to any religion in India terrorism has no religion Ajit Dovals statement

    याचबरोबर डोवाल म्हणाले की, ‘’भारतात कोणत्याही धर्माला धोका नाही. दहशतवादाला धर्म नसतो. भारत सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहिष्णुता, संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देतो. भारतात सर्वांना समान अधिकार आहेत.  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्मांना स्थान देण्यात भारत यशस्वी झाला आहे. आम्ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहोत. आमच्या देशातील मुस्लिम लोकसंख्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या ३३ सदस्य देशांच्या बरोबरीची आहे.’’

    डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा काय म्हणाले? –

    डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा म्हणाले की, भारताचा इतिहास आणि विविधतेचे आम्हाला कौतुक वाटते. विविध संस्कृतींमध्ये संवाद प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे. हिंदू बहुसंख्य राष्ट्र असूनही भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. अशा परिस्थितीत भारतीय मुस्लिमांना भारतीय असल्याचा अभिमान आहे. असं ते म्हणाले

    There is no threat to any religion in India terrorism has no religion Ajit Dovals statement

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India-Pakistan War : महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सह 16 जिल्ह्यांमध्ये उद्या Mock drill

    महाराष्ट्रातल्या महापालिका + जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; पुढच्या 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश!!

    MP Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे यांच्याविरुद्धची अवमान याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली