प्रतिनिधी
मुंबई : इन्कम टॅक्सच्या छापे मारीत खंड पडलेला नाही अखंड काम सुरू असलेल्या या छापेमारीत आता महाराष्ट्रातील साखर सम्राटांबरोबर भागीदारही अडचणीत आले आहेत.There is no clause in Income Tax raids; Along with the sugar emperors, partners are also in trouble!!
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात काल गुरुवारी राज्यात 24 ठिकाणी छापे घातले होते. त्यानंतर आज शुक्रवारी अधिकाऱ्यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्जुनवाडमध्ये साखर कारखान्याच्या भागीदारीवरुन कसून चौकशी केली जात आहे. सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदारांच्या निवासस्थानावर हा छापा घालण्यात आला आहे.
गुरुवारी अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी
गुरुवारी आयकर विभागाने राज्यातील 24 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आता आयकर विभागाने आता आपला मोर्चा कोल्हापूरकडे वळवला आहे. कोल्हापुरातील अर्जुनवाडमध्ये आयकर विभागने छापेमारी केली आहे. दरम्यान, गुरुवारी साखर कारखानदारी क्षेत्रातले मोठे नाव असलेल्या अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या.
There is no clause in Income Tax raids; Along with the sugar emperors, partners are also in trouble!!
महत्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये सत्तासंकट : मुख्यमंत्री सोरेन यांची आमदारकी रद्द, तरीही पुन्हा तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता
- मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- महाराष्ट्राच्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ!!
- महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ठाकरे सरकारचा प्रभाग पुनर्रचनेचा डाव; फडणवीसांचा गौप्यस्फोट