वृत्तसंस्था
नवी दिल्ली :घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल आज झालेला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. पण, व्यावसायिक सिलेंडरमध्ये तब्बल १०० रुपयांनी आज वाढ झाली आहे.
There is no change in the price of a domestic gas cylinder; ordinary consumers gets rilif
पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या नव्या किमती जाहीर करतात. आज त्याची घोषणा करण्यात आली. एलपीजी सिलेंडर स्वस्त होईल, अशी अपेक्षा होती. ती मात्र फोल ठरली आहे.
१ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे.गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १००रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
शहरातील व्यवसायिक गॅसचे दर ( १९ किलो)
- दिल्ली : २१०० रुपयांच्या पुढे आहे.
- मुंबईत : २०५१ रुपयांचा झाला आहे.
- कोलकाता : इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये.
- चेन्नई : सिलेंडरसाठी २२३४ रुपये.
There is no change in the price of a domestic gas cylinder; ordinary consumers gets rilif
महत्त्वाच्या बातम्या
- ४१ वर्षीय शेतकऱ्याचे मरणाेपरांत अंगदान ; चिमुकलीसह चार जणांना नवजीवन मिळणार
- एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ; अनिल परब यांनी दिली महत्वाची माहिती
- गोरगरीबांसाठीच्या उज्वला योजनेतही माध्यमाकडून राजकारण, मोदी सरकारने २०१९ पूर्वीच बहुतांश गरजुंपर्यंत पोहोचण्याचा केला प्रयत्न
- पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह