• Download App
    There is no captain change in Majdhar; BJP National President J. P. Extension of time for Naddas till Lok Sabha elections

    मजधारेत कॅप्टन बदल नाही; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मजधारेत बोटीचा कॅप्टन बदलत नाहीत त्यानुसार भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदत वाढ केली आहे. नड्डा हे 2024 जून पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत नड्डा यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. लालकृष्ण अडवाणी, अमित शाह यांच्यानंतर नड्डा हेच भाजपचे सलग दुसऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. There is no captain change in Majdhar; BJP National President J. P. Extension of time for Naddas till Lok Sabha elections

    भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतल्या या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची जोमदार वाटचाल सुरू असताना जे. पी. नड्डा यांनी भाजप पक्ष संघटनेच्या पातळीवर व्हायब्रंट नेतृत्व देऊन संघटनेला कार्यप्रवण ठेवले. कोरोना काळात सेवा ही संघटन हा मंत्र कार्यकर्त्यांमध्ये रुजवला.


    BJP – NCP Alliance : जखमा उरातल्या; मीठ राष्ट्रवादीचे; चोळतायत अशिष शेलार!!


    त्याचे चांगले परिणाम संपूर्ण देशाने पाहिले आहेत. भाजपा संघटनेला विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळाले आहे, याचा उल्लेख अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत केला.

    नड्डांच्या नेतृत्वाखाली भाजपने संघटनात्मक पातळीवर पूर्वोत्तर राज्ये, पश्चिम बंगाल, तेलंगण, तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील मजबुतीने पाय रोवले आहेत, याची आठवण अमित शाह यांनी करून दिली आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक देखील भाजपच्या संघटनात्मक पातळीवर जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    There is no captain change in Majdhar; BJP National President J. P. Extension of time for Naddas till Lok Sabha elections

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के