प्रतिनिधी
गांधीनगर : काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करून गुजराती जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. यामध्ये 300 युनिट पर्यंत मोफत वीज, 300 रूपयात घरगुती गॅस सिलेंडर यांचा समावेश आहे. पण या सगळ्या आश्वासनांमध्ये सर्वाधिक चर्चा एका आश्वासनाची आहे, ती म्हणजे गुजरात मध्ये काँग्रेस सत्तेवर आली तर जगातल्या सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या नामांतराची. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात नरेंद्र मोदी स्टेडियमचे नामांतर करण्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियात सर्वाधिक चर्चा याच आश्वासनाची आहे. There is a lot of talk in the Congress manifesto, but the promise of renaming Modi Stadium
काँग्रसने या जाहीरनाम्यात सर्वसामान्य जनता, महिला आणि शेतकऱ्यांसाठी (Farmers) अनेक आश्वासने दिली आहेत. मात्र यापेक्षा काँग्रेसच्या एका आश्वसनाची जोरदार चर्चा होते आहे. जर आम्ही सत्तेवर आलो तर नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलून सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असे करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे
काँग्रेसची इतर आश्वासने
शासकीय नोकऱ्यांमधील कंत्राटपद्धत संपेल. 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्यात येतील. तरुणांना 3 हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्यात येईल. घरगुती वापरासाठीचा सिलेंडर 300 रुपयात देण्यात येईल. 300 यूनिट वीज मोफत दिली जाईल. जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक नागरिकाला 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील. शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच वीज बिल माफ केले जाईल, असे अनेक आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.
शेतकऱ्यांना आश्वासन
गुजरातमधील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर देण्यासाठी भाव निर्धारण समिती स्थापित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. गरजू विद्यार्थ्यांना 5 ते 20 हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.
दुध उत्पादकांना अनुदान
याशिवाय गुजरात काँग्रेसने दुध उत्पादकांना प्रति लीटर 5 रुपयांचे अनुदान देणार असल्याचं म्हटलंय. तसेच 4 लाख रुपयांचा करोना भरपाई दिली जाईल. राज्यात 27 वर्षात झालेल्या गैरकारभारांची चौकशी होईल. अॅन्टी करप्शन एक्ट आणला जाईल, असे अनेक आश्वासने काँग्रेसने दिली आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम
गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी 2 टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे भाजप गुजरातचा गड राखणार की सत्तांतर होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
There is a lot of talk in the Congress manifesto, but the promise of renaming Modi Stadium
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा देणारे खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात दाखल
- सर्व काही सरकारनेच करावे हा विचार अभारतीय; दत्तात्रय होसबाळे यांचे प्रतिपादन
- इतिहासाची पुनरावृत्ती, दोन नातू एकत्र; माध्यमे मात्र रंगवताहेत आभासी चित्र!!
- हर हर महादेव सिनेमाच्या प्रेक्षकाला मारहाण केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना अटक