जाणून घ्या, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा नेमकं काय म्हणाले?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मद्य घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, भाजपने केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.then Arvind Kejriwal would not have accepted bail Himanta Biswa Sarma
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची टिप्पणी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले आहे. कोणताही सन्माननीय व्यक्ती हा जामीन स्वीकारणार नाही, असे ते म्हणाले.
सरमा म्हणाले, ‘काय जामीन मंजूर झालाय, कोणताही सन्माननीय व्यक्ती हा जामीन घेणार नाही. सन्मानीय व्यक्ती म्हणेल की मी नम्रपणे हा जामीन नाकारतो. हा कसला जामीन आहे की तुम्ही जाऊ शकता, पण 1 जूनला परत या.’
सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्याने तसेच त्यांना 2 जून रोजी पोलिसांसमोर शरण येण्याची अट घातल्याने हे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली 1 एप्रिल पासून तुरुंगात होते. प्रत्येक आठवड्याला त्यांच्या जामीनावर वेगवेगळ्या कोर्टांमध्ये सुनावणी झाली. परंतु प्रत्येक कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला होता.
then Arvind Kejriwal would not have accepted bail Himanta Biswa Sarma
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीचा विरोध; प्रचार हा मूलभूत अधिकार नाही
- PM मोदी-राहुल गांधींना जाहीर चर्चेचे आव्हान; 2 माजी न्यायमूर्ती आणि एका पत्रकाराने लिहिले पत्र
- महायुतीला पवारांनी महाराष्ट्रात 12 ते 13 जागा “दिल्या”; किती उदार अंत:करण साहेबांचे, म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली!!
- सौरऊर्जा उत्पादनात भारत पोहचला तिसऱ्या स्थानावर, जपानला टाकलं मागे!