• Download App
    अमेरिकेच्या हवाईत शतकातील सर्वात भीषण वणवा; 89 जणांचा मृत्यू, 2 हजार इमारती भस्मसात The worst wildfire of the century in America's Hawaii; 89 people died, 2 thousand buildings were burnt

    अमेरिकेच्या हवाईत शतकातील सर्वात भीषण वणवा; 89 जणांचा मृत्यू, 2 हजार इमारती भस्मसात

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकेतील हवाई राज्यातील जंगलात लागलेल्या वणव्यामुळे 89 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील जंगलात गेल्या 100 वर्षांतील ही सर्वात भीषण आग आहे. हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. सीएनएननुसार, गव्हर्नर म्हणाले की, हवाईमध्ये आगीमुळे 49.77 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. The worst wildfire of the century in America’s Hawaii; 89 people died, 2 thousand buildings were burnt

    माउई आणि लहैना सारख्या शहरांमध्ये 2 हजारांहून अधिक इमारती जळल्या आहेत. गव्हर्नर ग्रीनच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे 15,000 लोकांना त्यांची घरे सोडावी लागत आहेत. दुसरीकडे, आता परतणाऱ्यांना त्यांची जळालेली घरे पाहून मोठा धक्का बसला आहे. हवाईच्या कहलुई विमानतळावरील एक धावपट्टी मदत पुरवठ्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

    माऊईमध्ये 85% वणव्यावर नियंत्रण

    सीएनएनच्या म्हणण्यानुसार, अधिकारी आणि बचाव कर्मचार्‍यांनी माउईमधील 85% आगीवर नियंत्रण मिळवले आहे. त्याचवेळी, लाहैवा येथील पुलेहू जंगलात लागलेली आगदेखील 80% पर्यंत विझविण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जंगलातील आग शहरातील झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचली आहे. आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाणी फेकले जात असतानाही जमिनीखालील झाडांची मुळे जळत आहेत, त्यामुळे आग पुन्हा पसरण्याचा धोका आहे.



    यापूर्वी 2018 मध्ये कॅलिफोर्नियातील कॅम्प फायरमुळे 85 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुमारे 18 हजार घरे, इमारती आणि कार्यालये जळाली. आगीत 1.53 लाख एकर क्षेत्र जळून खाक झाले.

    मे महिन्यात कॅनडाच्या जंगलात आग लागली होती

    मे महिन्यात कॅनडाच्या जंगलांत आतापर्यंतची सर्वात भीषण आग लागली होती. त्याचा परिणाम येथील जवळपास सर्व 10 प्रांत आणि शहरांमध्ये दिसून आला. यामध्ये सुमारे 33 हजार चौरस किमीचा परिसर जळून खाक झाला. हे गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 13 पट अधिक आहे आणि बेल्जियमच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा मोठे आहे. यामुळे 1 लाख 20 हजारांहून अधिक लोकांना घरे सोडावी लागली होती.

    The worst wildfire of the century in America’s Hawaii; 89 people died, 2 thousand buildings were burnt

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!