वृत्तसंस्था
वाराणसी : जगातील सर्वात मोठे रिव्हर क्रूझ भारतात सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काशीमध्ये गंगेवर या क्रूझचे उद्घाटन करणार आहेत. भारतात लवकरच नदीतील सर्वात मोठ्या क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हे क्रूझ नदीत चालणारे जगातील सर्वात मोठे क्रूझ असणार आहे. यात शाॅवरसह बाथरुम्स आहेत. कन्वर्टेबल बेड्स, फेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म्स, लाईफ वेस्ट आणि स्प्रिंकलर्स यांचा समावेश आहे. The world’s largest river cruise will operate on the Ganga
या क्रूझचा प्रवास 13 जानेवारी 2023 रोजी वाराणसीपासून सुरु होईल आणि 1 मार्च रोजी हे क्रूझ दिब्रुगडला पोहोचण्याची शक्यता आहे. वाराणसीत गंगा आरती करून ही क्रूझ आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 13 जानेवारी, 2023 वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
क्रूझवर आहेत या सुविधा
एमव्ही गंगा विलास हे नदीवरील क्रुझ शुक्रवारी वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे. या क्रूझमध्ये आलिशान खोल्या आहेत. क्रूझवर एक आलिशान रेस्टाॅरंट, स्पा आणि सनडेकदेखील आहे.
क्रूझच्या मुख्य डेकवर 40 जणांसाठी आसनव्यवस्था असलेले रेस्टाॅरंट आहे. या रेस्टाॅरंट्समध्ये काॅन्टिनेंटल आणि भारतीय पाककृतींसह काही बुफे काऊंटर आहेत. वरच्या डेकच्या आऊटडोअर सीटिंगमध्ये रिअल टीक स्टीमर खुर्च्या आणि काॅफी टेबलही आहेत.
The world’s largest river cruise will operate on the Ganga
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा परिणामकारक मुकाबला; गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण
- जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ गंगेवर चालणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन
- CET परीक्षांच्या तारखा जाहीर; मार्च ते मे 2023 पाहा वेळापत्रक
- आदर्श घोटाळ्यातील दोषी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर राहुलजींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी