• Download App
    जागतिक आरोग्य संघटनेकडून पुन्हा भारतद्वेषाचे दर्शन, कोरोना बाधितांच्या आकडेवारीवर केला संशय व्यक्त|The World Health Organization (WHO) has again expressed anti-India sentiment, expressing skepticism over the number of Corona victims

    जागतिक आरोग्य संघटनेकडून पुन्हा भारतद्वेषाचे दर्शन, कोरोना बाधितांच्या आकडेवारीवर केला संशय व्यक्त

    अमेरिकेपासून अनेक देश कोरोनाबाधितांपासून ते कोरोनाने बळी गेलेल्यांची आकडेवारी लपवित असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र, तरीही जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) भारतद्वेष कायम आहे. भारत कोरोना बाधितांची संख्या लपवित असल्याचा संशय व्यक्त करून खरी आकडेवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.The World Health Organization (WHO) has again expressed anti-India sentiment, expressing skepticism over the number of Corona victims


    विशेष प्रतिनिधी

    जिनिव्हा: अमेरिकेपासून अनेक देश कोरोनाबाधितांपासून ते कोरोनाने बळी गेलेल्यांची आकडेवारी लपवित असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र, तरीही जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) भारतद्वेष कायम आहे.

    भारत कोरोना बाधितांची संख्या लपवित असल्याचा संशय व्यक्त करून खरी आकडेवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.



    अमेरिकेनेही कोरोना बळींची संख्या लपविल्याचे या देशाचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अ‍ँथनी फाऊची यांनीच मान्य केले होते. याशिवाय चीनपासून सगळ्या देशांची हिच स्थिती आहे. तरीही भारताबाबत संशय व्यक्त करण्यामागे षडयंत्र तर नाही ना, असा सवाल होत आहे.

    भारतात करोनामुळे होणारे बाधित आणि मृतांची संख्या चिंताजनक असून भारत सरकारने करोनाबाधितांची खरी आकेडवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले.

    स्वामीनाथन म्हणाल्या, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्यूशन यांनी ऑगस्टपर्यंत भारतात १० लाख करोनाबाधितांचा मृत्यू होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या भारताची स्थिती अतिशय चिंताजनक आहे.

    भारतातील करोनाबाधित आणि मृतांची संख्या ही दक्षिण-पूर्व भागातील देशांपेक्षाही अधिक आहे. भारताने आणि जगातील इतर देशांनीही करोनाबाधितांची आणि मृतांचा खरा आकडा जाहीर करण्याची आवश्यकता आहे.

    भारतात आढळलेला करोना विषाणूचा वेरिएंट अधिक जलदपणे फैलावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी म्हटले. भारतात आढळलेला इ.1.617 हा वेरिएंट जागतिक चिंतेचा विषय आहे. अशा प्रकारचा हा चौथा वेरिएंट असल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.

    The World Health Organization (WHO) has again expressed anti-India sentiment, expressing skepticism over the number of Corona victims

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य