• Download App
    मेहूल चोक्सीच्या पत्नीने बाहेर काढले मानवाधिकाराचे शस्त्र; मेहूल बरोबर चॅनेलवर दाखविलेली “ती महिला” मेहूलच्या ओळखीची बार्बरा नसल्याचाही दावा|the woman shown on media channels is not the same woman that they knew as Barbara: Mehul Choksi's wife, Priti Choksi to ANI

    मेहूल चोक्सीच्या पत्नीने बाहेर काढले मानवाधिकाराचे शस्त्र; मेहूल बरोबर चॅनेलवर दाखविलेली “ती महिला” मेहूलच्या ओळखीची बार्बरा नसल्याचाही दावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्यातील भगोडा आरोपी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी त्याच्या समर्थनासाठी बाहेर आली आहे.the woman shown on media channels is not the same woman that they knew as Barbara: Mehul Choksi’s wife, Priti Choksi to ANI

    तिने मेहूल चोक्सीच्या बचावासाठी मानवाधिकाराचे शस्त्र बाहेर काढले असून मेहूल चोक्सीला पोलीसांनी बेकायदेशीररित्या टॉर्चर केल्याचा आरोप केला आहे. हे त्याच्या मानवाधिकाराचे हनन असल्याचाही तिने दावा केला आहे.



    त्याच बरोबर तिने आणखी एक खळबळजनक दावा केला आहे, तो म्हणजे मेहूल चोक्सीबरोबर जी महिला सारखी टीव्ही चॅनेलवर दाखविली जात आहे आणि तिचे नाव बार्बरा सांगितले जात आहे, ती मेहूल चोक्सीकडे नेहमी येणारी बार्बरा नाहीच. अर्थात या दाव्याला पोलीसांची पुष्टी मिळालेली नाही.

    एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रीती चोक्सीने मेहूल चोक्सीवर अन्याय झाल्याचा दावा केला आहे. मेहूल बार्बरा नावाच्या महिलेला ओळखतो. ती अँटिग्वाला आली की मेहूलकडे नेहमी येत असे.

    पण आता जी महिला टीव्ही चॅनेलवर मेहूल बरोबर दाखविण्यात येत आहे, ती मेहूलच्या ओळखीची बार्बरा नाही, असा दावा प्रीती चोक्सीने केला आहे.

    मेहूलला अनेक विकार आहेत. त्याला शारीरिक इजा होण्याइतपत टॉर्चर करण्यात आले आहे. त्याची मनःस्थिती ढासळलेली आहे. हे त्याच्या मानवाधिकाराचे हनन आहे, अ

    से सांगून प्रीती म्हणाली, की मेहूल आम्हाला जिवंत हवा आहे. त्याच्याकडे अँटिग्वाचे नागरिकत्व आहे. त्याला त्या नागरिकत्वानुसार सगळे संरक्षण मिळविण्याचा आणि आपली बाजू न्यायालयात मांडण्याचा हक्क आहे. त्याला मारहाण का करण्यात आली, याचे उत्तर पोलीसांना द्यावे लागेल.

    the woman shown on media channels is not the same woman that they knew as Barbara: Mehul Choksi’s wife, Priti Choksi to ANI

    Related posts

    Vikram Misri : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक्स अकाउंट प्रायव्हेट केले; युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर ट्रोलिंग सुरू झाले

    Operation sindoor : सुरुवातीला 7, नंतर 11 आणि आज 14, ठोकले कराची ते इस्लामाबाद; भारताने टप्प्याटप्प्याने उलगडली हवाई हल्ल्यांची मालिका!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!