वृत्तसंस्था
मेंगलोर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या मोर्चा यांनी हत्या केलेल्या संघ कार्यकर्ता प्रवीण नेतारू यांच्या पत्नीला कर्नाटक काँग्रेस सरकारने सरकारी नोकरीतून काढून टाकले आहे. The wife of Praveen Netaru, who was killed by the PFI terror outfit, has been sacked by the Karnataka Congress government
प्रवीण नेतारू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. पीएफआयच्या दहशतवादी म्होरक्यांनी त्यांची हत्या केली होती. त्यानंतर कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी घरात कोणीच नसल्याने तत्कालीन कर्नाटक भाजप सरकारने प्रवीण नेतारू यांच्या पत्नी नूतन कुमारी यांना मेंगलोर मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता कोश या कार्यालयात सहाय्यक पदावर सरकारी नोकरी दिली. सुमारे वर्षभर त्या सरकारी नोकरीत कार्यरत होत्या.
परंतु आता शिस्तभंगाची कारवाई या नावाखाली कर्नाटक कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने प्रवीण नेतारू यांच्या पत्नीला सरकारी नोकरीतून काढून टाकले आहे. कर्नाटक भाजपने राज्य सरकारच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
हिजाब बंदीचा निर्णय फिरवणार
पण आता कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यानंतर आधीच्या भाजप सरकारने घेतलेला वेळोवेळी यांना निर्णयांना फिरवण्याचे काम सुरू झाले आहे. आधीच्या भाजप सरकारने सुप्रीम कोर्टात हिजाब बंदी विषयी अनुकूल भूमिका घेऊन प्रतिज्ञापत्र सादर केले होते. पण आता काँग्रेस सरकार मात्र हे प्रतिज्ञापत्र मागे घेऊन कर्नाटकात हिजाब बंदी करता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. त्याचबरोबर जुन्या सरकारचे अनेक निर्णय काँग्रेस सरकार फिरवणार आहे.
The wife of Praveen Netaru, who was killed by the PFI terror outfit, has been sacked by the Karnataka Congress government
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!
- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
- मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!
- सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..