भारताच्या विजायवर पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा एकतर्फी सामना झाला होता. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मोठ्या नेत्यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की संपूर्ण देशाने भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला, परंतु एकाही विरोधी नेत्याने भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले नाही. The whole country rejoiced over Indias victory but not a single word came out of Mohabbat ki shop Chief Minister Himanta Biswa Sarma
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आणि म्हटले, “वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले. संपूर्ण देशाने भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला, पण ‘मोहब्बत की दुकां’मधून एकही शब्द निघाला नाही.”
शनिवारी टीम इंडियाच्या विजयाची पोस्ट करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, अहमदाबादमध्ये भारतीय संघाने अष्टपैलू खेळी करत उत्कृष्टत विजय मिळवला. याशिवाय त्यांनी टीम इंडियाला आगामी सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या. मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींनीही भारतीय संघाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत, शुभेच्छा दिल्या.
The whole country rejoiced over Indias victory but not a single word came out of Mohabbat ki shop Chief Minister Himanta Biswa Sarma
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!