• Download App
    लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, फायजर लसीला परवानगी, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती|The way for immunization of children, permission for Pfizer vaccine, Information by Dr. Randeep Guleria

    लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, फायजर लसीला परवानगी, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती

    मुलांमध्ये कोरोना संसर्ग सौम्य स्वरुपात असतो. यामुळे आपल्याला सर्वात आधी ज्येष्ठ नागरिकांना आणि गंभीर आजार असलेल्यांना लस दिली पाहिजे. लहान मुलांसाठी फायजर लसीला एफडीएची मंजुरी मिळाली आहे. फायजरची लस भारतात आणण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची महत्त्वाची माहिती दिली आहे.The way for immunization of children, permission for Pfizer vaccine, Information by Dr. Randeep Guleria


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: मुलांमध्ये कोरोना संसर्ग सौम्य स्वरुपात असतो. यामुळे आपल्याला सर्वात आधी ज्येष्ठ नागरिकांना आणि गंभीर आजार असलेल्यांना लस दिली पाहिजे. लहान मुलांसाठी फायजर लसीला एफडीएची मंजुरी मिळाली आहे. फायजरची लस भारतात आणण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची महत्त्वाची माहिती दिली आहे.

    गुलेरिया म्हणाले, भारत बायोटेकला मंजुरी मिळाल्यास २ ते १८ वर्षांदरम्यानच्या मुलांना लस देता येईल. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी मिळताच लहान मुलांना लगेचच लस दिली जाईल. कोवॅक्सिनची चाचणी लवकरच पूर्ण होईल.



    २ ते ३ महिन्यांच्या फॉलोअप आल्याने सप्टेंबरपर्यंच डेटा हाती येण्याची अपेक्षा आहे. यामुळे तोपर्यंत लसीला मंजुरी मिळेल अशी आशा आहे. तर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांसाठी लस उपलब्ध असेल.
    तिसरी लाट रोखणं आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी करोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले तर संसर्ग वाढणार नाही.

    यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचं आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. ज्या ठिकाणी करोना रुग्णांची संख्या अधिक आहे तिथे लॉकडाउन लावावा आणि सर्वांनी लस घ्यावी, असं आवाहन गुलेरिया यांनी केलं.
    सीरम इन्स्टिट्यूटकडून मुलांवरील नोवावॅक्सची क्लिनिकल चाचणी जुलैपासून सुरू होणार आहे.

    सीरमने तसे नियोजन केले आहे. नोवावॅक्सच्या प्रभावासंबंधी येणारी आकडेवारी उत्साहजनक आहे. नोवावॅक्सचे सार्वजनिकरित्या उपलब्ध आकडेही लस सुरक्षित आणि अधिक प्रभावी असल्याचे संकेत देत आहे, असं काही दिवसांपूर्वी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं होते.

    The way for immunization of children, permission for Pfizer vaccine, Information by Dr. Randeep Guleria

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य