विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने भारतीय मतदारांची संख्या जाहीर करत जागतिक पातळीवर भारतीय लोकशाहीचा आवाज किती बुलंद आहे याचेच अत्यंत आणून दिले भारतात तब्बल 96 कोटी 88 लाख मतदार 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा फैसला करणार आहेत. हा एक जागतिक विक्रम ठरणार आहे कारण जगातल्या कुठल्या देशांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार नाहीत चीनची लोकसंख्या जरी भारताच्या तुलनेत अधिक असली तरी तिथे मुळातच लोकशाही नसल्याने मतदार ही संकल्पना धुसरच आहे.The voice of democracy will be a world record; 96 crore 88 lakh voters will decide on 2024!!
या पार्श्वभूमीवर अमेरिका, रशिया आणि अखंड युरोप यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार संख्या भारतात आहे हे 96 कोटी 88 लाख या आकड्याने सिद्ध केले आहेत. निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
6 % नवीन मतदारांची भर
मतदार म्हणून ज्या नवीन नोंदी झाल्या त्यामध्ये 6 % नवीन मतदारांची भर पडली आहे. या आकडेवारीमध्ये 18 ते 29 वयोगटातील 2.63 कोटी नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. ज्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, त्यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. 2.63 कोटी नवीन मतदारांपैकी 1.41 कोटी महिला मतदार आहेत, तर यातील पुरुष मतदारांची संख्या 1.22 कोटी आहे.
देशात एकूण 96 कोटी 88 लाख 21 हजार 926 मतदार आहेत. यामध्ये 49 कोटी 72 लाख 31 हजार 994 पुरुष, तर 47 कोटी 15 लाख 41 हजार 888 महिला मतदार आहेत. देशातील राजस्थान या राज्यामध्ये सर्वाधिक 5 कोटींहून अधिक मतदार आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात 5.32 कोटींहून अधिक मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) प्रवीण गुप्ता यांनी दिली.
The voice of democracy will be a world record; 96 crore 88 lakh voters will decide on 2024!!
महत्वाच्या बातम्या
- पासपोर्ट क्रमवारीत भारताची 5 स्थानांनी घसरण, या सहा देशांचे पासपोर्ट सर्वात शक्तिशाली
- ब्रिटिश पीएम ऋषी सुनक यांच्याविरुद्ध बंडाची तयारी; 100 खासदार राजीनामा देण्याची शक्यता
- छत्रपती शिवरायांचे आग्रा येथे स्मारक उभारणार केंद्र सरकार, कोठी मीना बाजारात औरंगजेबाने ठेवले होते कैदेत
- निवडणुकीत अजितदादांचा व्हीप शरद पवार गटाला लागू नाही; सुप्रीम कोर्टाचे आदेश, आयोगाने दिलेले नाव वापरणार