वृत्तसंस्था
चंडीगड : हरियानातील कर्नाल येथे शेतकरी आंदोलकांवर लाठीमाराचा आदेश देणाऱ्या तसेच त्यांच्या विषयी डोकी फोडण्याची भाषा वापरणाऱ्या एस. डी. एम. आयुष सिंग यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चोटाला यांनी जाहीर केले आहे. The use of such kind of words by an IAS officer for farmers is condemnable. Definitely, action will be taken against him
कर्नाल येथे शेतकरी आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्यानंतर त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला होता. या लाठीमाराचा विरोधी पक्षांनी निषेध केला असतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये एस. डी. एम. आयुष सिंग हे पोलिसांना शेतकऱ्यांची डोकी फोडा असे सांगताना आढळले आहेत.
या व्हायरल व्हिडीओ मुळे शेतकऱ्यांचा संताप अधिकच भडकला. पंजाबमध्ये आज शेतकऱ्यांनी अमृतसर महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देशात सरकारी तालिबान्यांची सत्ता आहे. पोलिसी बळावर ते सगळ्या देशाला वेठीला धरत आहेत, अशी टीका केली होती.
हरियाणा सरकारवर अशी चौफेर टीका होत असताना उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंह यांनी एस. डी. एम. आयुष सिंग यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन आंदोलक शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचे डोकी फोडण्याची भाषा हरियाणा सरकारला मान्य नाही असे ते म्हणाले आहेत.
आयुष सिंग यांना खुलासा मागितल्यावर त्यांनी आपण दोन दिवस झोपू शकलो नसल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांना हे माहिती नाही की शेतकरी वर्षभरातला 365 दिवसांपैकी 200 दिवस झोपू शकत नाही. त्यामुळे त्यांनी कितीही खुलासा केला तरी शेतकऱ्यांची डोकी फोडण्याची भाषा योग्यच
नाही. आणि ती हरियाणा सरकारला देखील मान्य नाही, असे उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंह यांनी स्पष्ट केले.