भारताची औषधाची गरज आम्ही समजू शकतो असे म्हणत अमेरिकेने लवकरच औषध निर्मितीसाठी कच्चा माल पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अनेक प्रकारचा कच्चा माल अमेरिकेहून आयात होतो. मात्र, अमेरिकेने देशांतर्गत गरज भागविण्यासाठी निर्यातीवर बंधने आणणारा कायदा आणल्याने कच्चा मालाच्या निर्यातील बंदी घातली आहे.’
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची औषधाची गरज आम्ही समजू शकतो असे म्हणत अमेरिकेने लवकरच औषध निर्मितीसाठी कच्चा माल पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अनेक प्रकारचा कच्चा माल अमेरिकेहून आयात होतो. मात्र, अमेरिकेने देशांतर्गत गरज भागविण्यासाठी निर्यातीवर बंधने आणणारा कायदा आणल्याने कच्चा मालाच्या निर्यातील बंदी घातली आहे. The US understood India’s need for medicine, promising to supply raw materials soon
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या काळापासूनन अमेरिकेत वॉरटाईन डिफेन्स प्रॉडक्शन अॅक्ट (डीपीए) लागू आहे. या कायद्यामुळे अमेरिकेतील कंपन्यांसाठी देशांतर्गत गरज भागविणे बंधनकार असते. अमेरिकेला कोरोनाचा मोठा फटका बसल्याने येथील कंपन्यांनी आपली सर्व संसाधने देशातील लोकांसाठी वापरण्या सुरूवात केली आहे.
अमेरिकेत फायझर आणि मॉडर्नाया दोन कोरोना प्रतिबंधक लसी बनत आहेत. संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्याचा अमेरिकेचा निर्धार आहे. त्यामुळे कोरोना लसीसाठी लागणाºया कच्चा मालाची गरज वाढली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे कच्चा मालाचा पुरवठा करावा अशी विनंती केली होती.
भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू यांनी नुकतीच अमेरिकेच्या प्रशासनाशी चर्चा सुरू केली आहे. कोरोना लसीसाठी लागणारा कच्च माल पुरवावा अशी मागणी त्यांनी केली.
The US understood India’s need for medicine, promising to supply raw materials soon
महत्त्वाच्या बातम्या
- कट्टरतावादासमोर पाक सरकारची पुन्हा सपशेल शरणागती , फ्रान्सच्या राजदूताची गच्छंती अटळ
- बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचाराची शक्यता; आज सहाव्या टप्प्यातील ४३ जागांसाठी मतदान
- कोरोना रुग्णांसाठी मशिदीमध्ये उभारले कोविड सेंटर ; गुजरातमधील वडोदरात सामाजिक बांधिलकी जपली
- महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली, भाजीपाला, बेकरीला आता चार तासांचाच वेळ
- खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण