• Download App
    अमेरिकेलाही पचवता आला नाही युक्रेन युद्धाचा धक्का, पेट्रोल डिझेल किंमतीत 50 टक्के वाढ, भारतात मात्र 5 टक्यानेच वाढले|The US could not digest the shock of Ukraine war, petrol and diesel prices increased by 50%, but in India it increased by only 5%.

    अमेरिकेलाही पचवता आला नाही युक्रेन युद्धाचा धक्का, पेट्रोल डिझेल किंमतीत 50 टक्के वाढ, भारतात मात्र 5 टक्यानेच वाढले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – अमेरिकेलाही रशिया आणि युक्रेन युद्धाचा धक्का पचवता आला नाही अमेरिकेमध्ये पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढले आहे भारतामध्ये मात्र विक्री युद्ध सुरू झाल्यानंतर ही पेट्रोलच्या किमतीत केवळ पाच टक्के वाढ झाली आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत दिली.The US could not digest the shock of Ukraine war, petrol and diesel prices increased by 50%, but in India it increased by only 5%.

    युक्रेनची युद्ध सुरू झाल्यापासून भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यावर हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत बोलताना विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून घेतली. ते म्हणाले,



    माझ्याकडे यूएसए, कॅनडा, जर्मनी, यूके, फ्रान्स, स्पेन, श्रीलंका आणि भारताची माहिती आहे. त्या सर्व देशांमध्ये अलीकडच्या काही दिवसांत पेट्रोलच्या किमती ५०%, ५५%, ५८%, ५५% वाढल्या आहेत. भारतात ती फक्त ५% वाढली आहे.

    पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना पुरी म्हणाले, जेव्हा आम्ही पाहिले की ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे, तेव्हा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी दर कमी केले. आम्ही काही पावले उचलली आहेत. तसेच आणखी काही निर्णय घेण्यासाठी आम्ही तयार आहेत. परंतु ९ राज्यांनी तसे केलेले नाही. कर आकारणी हा फक्त एक पैलू आहे, आम्हाला उपभोगाच्या टप्प्यावर ग्राहकांना दिलासा द्यायचा आहे.

    सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी अनुदानाच्या पुरवणी मागणीच्या तिसऱ्या तुकडीत १.०७ लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासाठी सोमवारी संसदेची मंजुरी मागितली. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी अनुदानाच्या पुरवणी मागण्यांचा तिसरा आणि अंतिम तुकडा दर्शविणारे निवेदन सादर केले.

    The US could not digest the shock of Ukraine war, petrol and diesel prices increased by 50%, but in India it increased by only 5%.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य