वृत्तसंस्था
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा गॅंगस्टर माफिया अतिक अहमद याचे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तैय्यबा आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सर्विसेस इंटेलिजन्स अर्थात ISI शी डायरेक्ट कनेक्शन असल्याचा धक्कादायक खुलासा उत्तर प्रदेश पोलिसांच्या आरोपपत्रात झाला आहे. खुद्द अतिक यानेच हा कबुलीनामा दिल्याची माहिती पोलिसांनी या आरोपपत्रात नमूद केली आहे. the UP Police chargesheet filed before the Court mentions a recorded statement of mafia-turned-politician Atiq Ahmed.
या आरोपपत्रामधून जो खुलासा झाला आहे, त्यात अतिक अहमद म्हणतो, की मला शस्त्रास्त्रांची कमतरता कधीही पडली नाही. कारण माझे पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तैय्यबा आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय यांच्याशी डायरेक्ट संबंध होते. या दोन्ही संघटना पाकिस्तान मधून पंजाब बॉर्डरवर ड्रोन मधून शस्त्रास्त्रे टाकायच्या. त्यांचे भारतातले एजंट ते तिथून गोळा करून जम्मू काश्मीर मधल्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना आणि भारतातल्या इतर राज्यातील माफियांना ही शस्त्रे पोचवायचे. मला पंजाब मधली अशी अनेक ठिकाणी माहिती आहेत, जिथे हे घडते. मला जर प्रत्यक्ष तिथे नेऊन तपास केला तर तिथून आजही शस्त्रास्त्रे, पैसा, फेक करन्सी रिकव्हर करायला मी मदत करेन, हा लेखी कबुलीनामा अतिक अहमद याने पोलिसांना दिला आहे आणि याचा उल्लेख पोलिसांनी उमेश पाल हत्याकांडातील आरोप पत्रात केला आहे.
याचा अर्थ उमेश पण हत्याकांड ही केवळ आयसोलेटेड फॉर्म मध्ये घडलेली घटना नाही तर तिच्या तारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांची संबंधित आहे आणि त्यामध्ये वापरलेली शस्त्रे देखील अशीच परदेशी बनावटीची आहेत.
अतिक अहमदच्या मुलाकडून ब्रिटिश बुलडॉग रिव्हॉल्व्हर आणि वॉल्थर रिव्हॉल्व्हर जप्त
झाशी : अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार मकसूद याचा मुलगा गुलाम यांचा यूपी पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर त्या दोघांकडून पोलिसांनी ब्रिटिश बुलडॉग रिव्हॉल्व्हर आणि वॉल्थर रिव्हॉल्व्हर हस्तगत केले आहे. तरीही उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या दोन माफियांचा फेक एन्काऊंटर केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार मसूद चा मुलगा गुलाम या दोघांचा उत्तर प्रदेश पोलिसांनी झाशीमध्ये रिंगटोन केला एन्काऊंटर केला त्यानंतर त्या दोघांकडून अत्याधुनिक बनावटीची दोन पिस्तुले जप्त केली यापैकी एक ब्रिटिश बुलडॉग रिवाल्वर .455 बोअरचे आहे, तर दुसरे वॉल्थर पी 88 7.63 बोअरचे पिस्तूल आहे. ही अत्यंत घातक शस्त्र मानली जातात पोलिसांनी ही शस्त्रे त्या दोघांकडून जप्त केली आहेत तरी देखील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्या एन्काऊंटरला फेक एन्काऊंटर चे नाव दिले आहे.
जुनैद आणि नासिर यांना मारणाऱ्या गुन्हेगारांचे तुम्ही एन्काऊंटर करणार नाही कारण तुम्ही धर्म बघून एन्काऊंटर करता जुने आणि नासिरचा फक्त एक आरोपी पकडला गेला. बाकी 9 आरोपी फरारी आहेत. ते तुम्ही पकडू शकत नाही, असा आरोप ओवैसी यांनी केला, तर भाजप सरकार नेहमीच फेक एन्काऊंटर करून महागाई, बेरोजगारी सारख्या मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न करते, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर गुंडा माफियों को छोडेंगे नही हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत केलेले भाषण सध्या तुफान व्हायरल होत आहे.
the UP Police chargesheet filed before the Court mentions a recorded statement of mafia-turned-politician Atiq Ahmed.
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
- कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!