कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताला मदत करण्याचे आश्वासन पाळत अमेरिकेने मदत पाठविली आहे. अमेरिकेच्या लष्करी विमानांनी मदत येण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेतून भारतात विमान दाखल झालं असून यामध्ये करोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये अजून काही विमानं मदत घेऊन भारतात दाखल होतील.The United States kept its promise of help, carrying medical supplies to the airport in Delhi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताला मदत करण्याचे आश्वासन पाळत अमेरिकेने मदत पाठविली आहे. अमेरिकेच्या लष्करी विमानांनी मदत येण्यास सुरूवात झाली आहे.
शुक्रवारी सकाळी अमेरिकेतून भारतात विमान दाखल झालं असून यामध्ये करोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये अजून काही विमानं मदत घेऊन भारतात दाखल होतील.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, भारतात मदत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
अमेरिकेच्या हवाई दलाचं सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं. या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारं वैद्यकीय साहित्य तसंच १० लाख रॅपिट करोना टेस्ट किट पाठवण्यात आलं आहे. लशीसाठी लागणारे घटक किंवा कच्चा माल पुरवण्याचंही अमेरिकेने मान्य केले आहे.
भारतातील अमेरिकी दुतावासाने ट्विट केलं असून यावेळी फोटो शेअर केले आहेत. ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे.
७० वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत असून करोना संकटाशी लढा देण्यासाठी अमेरिका खंबीरपणे भारतासोबत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले होते की, आम्हाला गरज असताना भारताने मदत केली आहे
त्यामुळे आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकटात असताना आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू. भारताला आपत्कालीन मदतीशिवाय साधनसामुग्रीही पुरवण्यात येईल.
The United States kept its promise of help, carrying medical supplies to the airport in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाविरुध्दच्या लढाईत अभिनेता बनला अॅम्ब्युलन्स चालक
- शेअर बाजाराने फुंकले एलआयसीच्या महसुलात प्राण, गुंतवणुकीतून कमाविला ३७ हजार कोटी रुपयांचा विक्रमी नफा
- रिलायन्स इंडस्ट्रीजला यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा
- उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा, कोरोना संदर्भातील विम्याचे दावे एक तासाच्या आता निकाली निघणार
- भारतीय सीईओ देशाच्या मदतीला, मास्टर कार्डने भारताला केली ७५ कोटी रुपयांची मदत