• Download App
    चिनी घुसखोरीचे जनरल नरवणे यांनी सांगितलेले सत्य आणि ए. के. अँटनींनी दिलेली कबुली The truth told by General Naravane about the Chinese invasion and A. K. Antony's Confession

    चिनी घुसखोरीचे जनरल नरवणे यांनी सांगितलेले सत्य आणि ए. के. अँटनींनी दिलेली कबुली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चिनी लष्कराच्या घुसखोरी बाबत एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. जनरल नरवणे यांच्या बातमी मुलाखतीचा काही भाग बातमी स्वरूपाने प्रसार माध्यमांनी जरूर दिला आहे. परंतु, त्यामध्ये जनरल नरवणे यांचे वाक्य चमकदारपणे प्रसारित करण्यात आले आहे. The truth told by General Naravane about the Chinese invasion and A. K. Antony’s Confession

    चिनी लष्कर अर्थात चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी रस्त्यावरच्या गुंड मवाल्यांसारखी वर्तणूक करते. लाठ्या काठ्या, लोखंडी शिगा घेऊन घुसखोरी करते. पण भारतीय सैन्य दलांनी त्यांना हाकलून लावले आहे, असे वक्तव्य जनरल नरवणे यांनी केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी रंगवून दिल्या आहेत.

    चिनी लष्कराची संभावना अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मीची संभावना जनरल नरवणे यांनी रस्त्यावरचे गुंड मवाली या शब्दात केली आहे हे खरेच. पण त्या पलिकडे जाऊन एक दाहक सत्य जनरल नरवणे यांनी सांगितले आहे, ते चीनच्या घुसखोरीच्या नियमित धोरणाचे आहे. त्या धोरणाला “स्लाइसिंग द इंडियन लँड” असे थोडक्यात संबोधता येईल.



    चिनी लष्कर पेट्रोलिंग करताना विशिष्ट भूभागात घुसते. तिथे कब्जा करते. तिथे थोडेफार इन्फ्रास्ट्रक्चर बनवते आणि हळूहळू तिथे कायमचे वसते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चिनी लष्कर पुढे येत राहते आणि आधीचा भूभाग आपलाच आहे, असा दावा ऐतिहासिक नकाशांच्या आधारे करत राहते. भारतीय भूमी बळकावण्याचा हा त्यांचा वर्षानुवर्षांचा कावा आणि डाव आहे. हे सत्य जनरल नरवणे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

    मात्र, भारतीयांना टोचणारे हे सत्य सांगणारे जनरल नरवणे हे एकटेच नाहीत. जे धोरणकर्ते आहेत, म्हणजे जे राज्यकर्ते आहेत, त्यांनी देखील अशीच कबुली 2013 मध्ये दिली होती. 6 नोव्हेंबर 2013 रोजी संसदेत केलेल्या भाषणात त्यावेळचे यूपीए सरकारचे संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी लोकसभेत बोलताना भारतीय सरकारने सीमा संरक्षणाकडे कसे दुर्लक्ष केले, याचीच कबुली दिली होती. संरक्षण मंत्री ए. के. अँटनी म्हणाले होते, की सीमावरती क्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित करण्यात भारतीयांपेक्षा कितीतरी आघाडीवर आहेत. भारतीय सरकारांनी सीमा सुरक्षा मजबूत करण्याकडे दुर्लक्ष केले, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. भारतीय सरकार यांचे हे धोरणच राहिले होते, की अविकसित सीमा म्हणजेच बेस्ट डिफेन्स. सीमा विकसित करू नका म्हणजेच आपल्या देशाच्या सीमांचा सीमांचे संरक्षण होईल, असे अनेक भारतीय सरकारांना वाटले ही कबुली देण्यात मी मागे हटणार नाही. कारण ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. आता मात्र भारतीय बाजू आपली सीमा विकसित करण्यात आणि सीमावर्ती क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे हळूहळू यशस्वी होत आहे.

    ए. के. अँटनी यांचे हे वक्तव्य संसदेच्या रेकॉर्डमध्ये आणि युट्युब वर उपलब्ध आहे. ए. के. अँटनी काँग्रेसचे नेते आहेत आणि यूपीए सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. त्यांनी आपल्याच पक्षाच्या आधीच्या सरकारांच्या धोरणात्मक चुकांकडे लोकसभेत लक्ष वेधले होते. सीमावर्ती क्षेत्र विकसित करताना आधीच्या सरकारांनी कसे दुर्लक्ष केले, याचे सविस्तर वर्णन अँटनी आपल्या निवेदनात केले होते. ही काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या चुकांची कबुली होती. जनरल नरवणे यांची मुलाखत वाचताना आणि ऐकताना अँटनींची ही कबुली आठवली आणि दाहक वस्तुस्थितीची जाणीव झाली.

    The truth told by General Naravane about the Chinese invasion and A. K. Antony’s Confession

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!