• Download App
    कोरानाविरुध्दच्या लढाईत उतरली रेल्वे, चार हजार दोनशे डबे कोरोना रुग्णांसाठी सज्ज The train landed in the battle against Corona, four thousand two hundred coaches ready for Corona patients

    कोरानाविरुध्दच्या लढाईत उतरली रेल्वे, चार हजार दोनशे डबे कोरोना रुग्णांसाठी सज्ज

    करोनाबाधितांची दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढती संख्या पाहून रेल्वे विभागाने रेल्वे डब्ब्यांचे कोविड केअर कोचमध्ये रूपांतर केले आहे. सद्यस्थितीस रेल्वे विभागाकडे १६ झोनमध्ये ४ हजार २ डब्बे करोना रुग्णांसाठी सज्ज आहेत. राज्य सरकारने जर या कोविड केअर कोचची मागणी केली, तर ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली आहे. The train landed in the battle against Corona, four thousand two hundred coaches ready for Corona patients


    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : करोनाबाधितांची दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढती संख्या पाहून रेल्वे विभागाने रेल्वे डब्ब्यांचे कोविड केअर कोचमध्ये रूपांतर केले आहे. सद्यस्थितीस रेल्वे विभागाकडे १६ झोनमध्ये ४ हजार २ डब्बे करोना रुग्णांसाठी सज्ज आहेत. राज्य सरकारने जर या कोविड केअर कोचची मागणी केली, तर ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली आहे.



    देशभरात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत करोनाबाधित आढळून येत आहेत, परिणामी आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे, रूग्णालयांमध्ये बेड्स, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा भासत आहे. अशावेळी देशाची करोनाविरोधातील सुरू असलेल्या लढाईत योगदान देण्यासाठी रेल्वे विभाग देखील पुढाकर घेताना दिसत आहे.

    कोविड केअर कोचमध्ये रेल्वेकडून रूग्णांच्या सुविधेसाठी अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कुलर, ऑक्सिजन सिलिंडर आदींचा यामध्ये समावेश आहे. पश्चिम रेल्वेकडे ३८६ आयसोलेशन कोच उपलब्ध असून, त्यापैकी १२८ कोच हे मुंबई विभागात आहेत. एखाद्या राज्याने या आयसोलेशन कोचची मागणी नोंदवल्यास, हे कोच त्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यास तयार असतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली होती.

    The train landed in the battle against Corona, four thousand two hundred coaches ready for Corona patients


    महत्वाच्या बातम्या वाचा

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य