विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीचे तीन टप्पे ठळकपणे पाहता येत आहेत. आज उत्तर प्रदेश तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. उत्तर प्रदेशाने गेल्या 30 वर्षांमध्ये गुंडाराज, बुलडोझर ते ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट एवढा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी लखनऊमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशाचा वाटचालीचा आढावा घेतल्यावर गुंड माफियांचे राज्य ते बुलडोझर बाबा आणि आता ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट हे तीन टप्पे ठळकपणे नजरेत भरतात. The three steps of Uttar Pradesh’s Watchali; Gundaraj; Bulldozer Te Aata Global Investors Meet
मुलायम – मायावतींचे राज्य
1990 च्या दशकात उत्तर प्रदेशात मुलायम सिंहांचे राज्य असताना अतिक अहमद, मुख्तार अन्सारी यांच्यासारख्या गुंडांच्या, राजाभय्या यांच्यासारख्या डझनभर दबंग आमदारांच्या कहाण्या बातम्या म्हणून भारतभर प्रसिद्ध व्हायच्या. अमरसिंहांसारखे राजकीय हस्तक दिल्लीपर्यंत आपली बैठक जमवून होते. दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातली राजकीय साठ गांठ ते बांधत होते. त्यानंतर मायावतींच्या आणि कांशीराम यांच्या बातम्या आल्या. त्यांच्या राजवटीत देखील गुंडागर्दी कमी झाली नाही. उलट वाढली. पण सोशल इंजिनिअरिंग नावाचा शब्द त्यांनी रूढ केला. “ब्राह्मण बनिया ठाकूर चोर, बाकी सब डीएस फोर” या घोषणेपासून ते “हाथी नही गणेश है ब्रह्मा विष्णू महेश है” या घोषणेपर्यंत मायावतींचा राजकीय वाटचाल झाली. पण आता त्यांचे राजकीय भवितव्य अस्तंगतच झाल्यात जमा आहे. त्यांच्या राजवटीतही गुंडागर्दीच्याच बातम्या हेडलाईन्स मध्ये झळकत होत्या. कारण अतिक अहमद, पासून ते मुख्तार अन्सारीपर्यंत पूर्वांचलातील सर्व गुंड समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यातूनच आपली राजकीय कारकीर्द झळकवत होते. मध्येच कल्याण सिंहांच्या राजवटीचा छोटा टप्पा येऊन गेला होता.
2017 नंतर बदल
पण 2014 नंतर हे चित्र बदलले आणि उत्तर प्रदेशाने कात टाकायला सुरुवात केली. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर भाजपने योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवले आणि तिथून पुढे बुलडोझर बाबाचे राज्य सुरू झाले. त्याआधी राज्यातले गुंड माफिया गळ्यात पाट्या अडकून आपला एन्काऊंटर करू नका, अशा विनवण्या करत पोलीस स्टेशनचे खेटे घालायला लागल्याचे दिसले.
बुलडोझर बाबाचे राज्य
उत्तर प्रदेशातल्या गुंडागर्दीचा संपूर्ण सफाया केल्याखेरीज राहायचे नाही, अन्यथा राज्याची गणना गुंडागर्दीच्याच राज्यांमध्ये होत राहील याची पक्की जाणीव केंद्रातल्या मोदी सरकारला आणि राज्यातल्या योगी सरकारला होती आणि त्यातूनच योगींनी गुंडांविरुद्ध बुलडोझरची तडाखे बंद कारवाई सुरू केली. अतिक अहमद, मुख्तार अन्सारी यांच्यासह अनेक गुंड माफियांचे साम्राज्य बुलडोझरने उद्ध्वस्त केले. इतकेच नाही तर मेरठ मधल्या भंगार मार्केटच्या अर्थव्यवस्थेला देखील याच बुलडोझरने सुरुंग लावला. तिथल्या हाजीला आत टाकले. एक प्रकारे गेल्या 5 वर्षात योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात बुलडोझरने सफाई करून टाकली.
काशी विश्वनाथाचा आशीर्वाद
दरम्यानच्या काळात काशी विश्वनाथ धाम कॉरिडोर उभे राहिले आणि तिथून उत्तर प्रदेशाच्या सकारात्मक वाटचालीला सुरुवात झाली. ही केवळ धार्मिक वाटचाल नव्हती, तर उत्तर प्रदेशाची मूळ ताकद ओळखणारी वाटचाल सुरू झाली आणि आज जेव्हा तेथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे, अशावेळी ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट योगी सरकारने आयोजित केली आहे. गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेश नुसतेच सुरक्षित वाटावे असे नाही तर ते आकर्षकही वाटले पाहिजे यासाठी योगी सरकारने छोट्या मोठ्या शहरांमधून गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम घेतले आहेत.
उद्यमशीलतेला वाव
गुंतवणूकदारांचा विश्वास कमवणे ही सोपी बाब नव्हती. फक्त गुंडागर्दीच्या राज्याची इमेज पुसून भागणार नव्हते, तर इथे कौशल्यालाही वाव आहे याची जाणीव गुंतवणूकदारांना करून देणे आवश्यक होते. यासाठी ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योगांना देखील प्रोत्साहन देऊन ते वाढविण्याचा गेल्या 5 वर्षात प्रयत्न झाला त्याचे फलस्वरूप म्हणून आजची ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट लखनऊ मध्ये होते आहे. उत्तर उत्तर प्रदेशाची खऱ्या अर्थाने ओळख बदलणारी ही मीट ठरू शकेल. कारण योगींनी आधीच उत्तर प्रदेशात बॉलिवूडला पर्याय ठरू शकेल अशी फिल्म इंडस्ट्री उभारण्याची पायाभरणी केलीच आहे. पण हा केवळ एक भाग झाला.
राज्यातल्या उद्यमशीनतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्या पलिकडची ही गुंतवणूक अपेक्षित असताना भारताच्या जी 20 अध्यक्ष पदाची संधी उत्तर प्रदेशाने प्रथम उचलली आहे आणि त्यातूनच ही ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट होते आहे. यात करार किती लाख कोटी रुपयांचे होतील, हा भाग अलहिदा. ते करार तर होतीलच. पण त्याहीपेक्षा उत्तर प्रदेशाची नवी ओळख गुंड माफियांचे राज्य ते गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे पॉवर हाऊस अशी असेल हे महत्त्वाचे ठरणार आहे.
The three steps of Uttar Pradesh’s Watchali; Gundaraj; Bulldozer Te Aata Global Investors Meet
महत्वाच्या बातम्या
- तुर्कीचा भारतविरोध विसरून भारताची तुर्कीला मदत; तुर्की महिलेची भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी
- शेकडो विद्यार्थ्यी, सोशल मीडिया एन्फुएन्झर्सना आज मुंबईतून वंदे भारत एक्सप्रेसची मोफत सफर
- राज्यसभेत मोदींच्या भाषणात विरोधकांच्या घोषणाबाजीचे अडथळे, पण समाजातील लाभार्थ्यांना १०० % लाभाचा पंतप्रधानांचा निर्धार