विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : फेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट नवीन रुग्णांच्या आकडेवारीचा कळस गाठणार आहे. या दरम्यान रोज सरासरी 4 लाख ते 8 लाख नवीन रुग्ण सापडतील. मुंबई आणि नवी दिल्लीत 15 जानेवारीलाच आकडेवारीचा पीक (उच्चांक) येणार अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.The third wave of corona will reach its peak in February, but will subside in March
आयआयटी कानपूरच्या गणित आणि संगणक शास्त्राचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी संगणकीय मॉडेलच्या माध्यमातून कोरोनाच्या तिसºया लाटेत रुग्णांचे प्रमाण कसे असेल याची माहिती दिली. त्यांच्या मते, 15 मार्च पर्यंत कोरोनाची तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात होईल. अग्रवाल यांनी सांगितले की मुंबईत तिसऱ्या लाटेचा पीक 15 जानेवारीपासून जाणायला लागेल.
दिल्लीत सुद्धा या दरम्यान अशीच परिस्थिती राहिल. आमच्याकडे संपूर्ण देशाची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. तरीही प्राथमिक आकलनानुसार फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच देशात कोरोनाच्या तिसºया लाटेचा उच्चांक राहील. या दरम्यान, देशात रोज 4 ते 8 लाख नवे रुग्ण सापडतील.
मुंबई आणि नवी दिल्लीत ज्या वेगाने कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख वाढतोय, ते पाहता हा आलेख लवकर खाली येईल अशी शक्यता कमीच आहे. पूर्ण देशातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एका महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येणार आणि मार्चमध्ये ही लाट ओसरणार अशी शक्यता आहे.
अग्रवाल म्हणाले, महामारी नियंत्रित नसतात हे मान्य आहे. तरीही यात काही मापदंड ठरलेले असतात. एखादी संक्रमित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास संक्रमण वाढणार असे गणित आहे. पुढे हे संक्रमण वाढत राहणारे असते. अर्थातच जितके लोक संक्रमित होतील, तितका या व्हायरसचा फैलाव होत जाईल.
याच संक्रमणाच्या आधारे आमचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. या मॉडेलवर काम करताना आमच्या निदर्शनास आले की भारतीय आकडेवारीचा दर्जा इतर देशांच्या आकडेवारीच्या तुलनेत चांगला आहे. आपण स्वत:चे कौतुक करतोय असे नाही. परंतु, आरोग्य मंत्रालयाचे कौतुक करावे लागेल अशी ही क्वालिटी आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला डेटा उपलब्ध करून दिला.
अग्रवाल यांनी सांगिते, की देशात 40 लाख ते 50 लाख जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे अनेक अहवालांमध्ये नमूद आहे. तरीही इतक्या मोठ्या मृत्यूचा आकडा गायब कसा होऊ शकतो. रेकॉर्ड नसायला आपण काही अश्मयुगात नाही. अनेक राज्यांमध्ये स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या.
दुसरी लाट पीकवर असताना केवळ 10 दिवसांमध्ये हे सर्व काही घडले होते. एकूणच महामारीमध्ये झालेल्या मृतांचा आकडा मोजला जाईल तेव्हा सरासरी आकडेवारी जास्त वाटणार नाही. कुणाला त्याचे गांभीर्य पण राहणार नाही. जितक्या मृत्यूंची नोंद झाली आहे, प्रत्यक्षात ती आकडेवारी 10 पटीने अधिक असावी.
The third wave of corona will reach its peak in February, but will subside in March
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवा एकनाथ खडसे यांनी टीकेची पातळी सोडली
- शिवसेना-राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा पतंग काँग्रेसने गोव्यात शिरण्यापूर्वीच काटला
- WATCH : एटीएम सेंटरला भीषण आग कल्याणमध्ये घटना; काही सेकंदात सेंटर भस्मसात
- जयंत पाटलांना गोटखिंडी येथील चिमुकलीचा प्रेमळ सल्ला , म्हणली – साहेब…..