विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो (सीबीआय) प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवला आहे. ईडी आणि सीबीआयच्या संचालकपदावरील कोणताही अधिकारी ५ वर्षे सेवा करू शकणार आहे. केंद्राने एका अध्यादेशाद्वारे दोन्ही संस्थांच्या प्रमुखांच्या कार्यकाळात वाढ केली आहे.The tenure of the ED and CBI chiefs is now five years
संजय मिश्रा हे सध्या अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक आहेत. त्यांचा कार्यकाळ या आठवड्यात संपत होता. मात्र, आता अध्यादेशानंतर सरकार इच्छित असल्यास त्यांचा कार्यकाळ आणखी दोन वर्षे वाढवू शकते. मात्र, संजय मिश्रा यांच्याबाबत अद्याप सरकारकडून कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. सध्या या दोन्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या संचालकांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. संसदेचे अद्याप अधिवेशन सुरू नसल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अध्यादेशांना मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ईडी आणि सीबीआयकडून तपास विविध प्रकरणी तपास सुरू आहे. महाराष्ट्रात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. तसंच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यासह आणखी काही नेत्यांवर कारवाई सुरू आहे.
वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच ईडीने महाराष्ट्रात छापे टाकले आहेत. पुण्यात हे छापे टाकण्यात आले. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवर मुंबई आणि पुण्यात छापे टाकले होते.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीने आॅगस्टमध्ये छापे टाकले. तसंच सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या घरी ईडीने छापे टाकला होता. तसंच मनी लाँड्रींग प्रकरणी ईडीने परिवनह मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली होती. या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनाही ईडीने नोटीस बजावली होती.
The tenure of the ED and CBI chiefs is now five years
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी