• Download App
    लोकशाहीच्या नावाने गळे काढणाऱ्या केजरीवालांची हुकूमशाही, टीका केली म्हणून विद्यार्थिनीला ठोठावला पाच हजार रपिये दंड, परीक्षेला बसू देणार नसल्याचा इशारा|The student was fined Rs 5,000 for criticizing Arvind Kejriwal and warned her not to sit for the exam

    लोकशाहीच्या नावाने गळे काढणाऱ्या केजरीवालांची हुकूमशाही, टीका केली म्हणून विद्यार्थिनीला ठोठावला पाच हजार रपिये दंड, परीक्षेला बसू देणार नसल्याचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकशाहीच्या नावाने गळे काढत असतात. परंतु, त्यांच्याच हुकूमशाहीचा प्रत्यय एका विद्यार्थिनीला आला आहे. केजरीवाल यांच्यावर टीका केल्यामुळे या विद्यार्थिनीला पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड भरल्याशिवाय या विद्यार्थिनीला परीक्षेला बसू देणार नसल्याचेही म्हटले आहे.The student was fined Rs 5,000 for criticizing Arvind Kejriwal and warned her not to sit for the exam

    महाविद्यालयातील ऑनलाईन पदवीप्रदान समारंभाच्या वेळी एमएला शिकत असलेल्या नेहा या विद्यार्थिनीने आरक्षणाच्या धोरणामधील घटनात्मक बदल आणि प्रचंड वाढलेले शुल्क यावरून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांची नाही असे म्हटले होते.

    नेहा यांचे हे वक्तव्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविषयी अनादर व्यक्त करणारे आहे. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार नेहा यांनी 23 डिसेंबर 2020 रोजी नवव्या वार्षिक दीक्षांत समारंभाच्या वेळी यूट्यूब थ्रेडमध्ये गोंधळ घातला. आक्षपार्ह टिप्पणी केल्याचे निदर्शनास आले आहे.

    प्रॉक्टोरियल बोडार्ने या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी उपसमिती गठित केली होती व त्याचा अहवाल दिला होता. उपसमितीने याबाबत नेहा यांचीहीसाक्ष घेतली. त्यामध्ये तिने आपण आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचे कबुले केले आहे.

    मात्र, त्यासाठी आपण दोषी आहे असे वाटत नसल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे विद्यापीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नेहा यांना परफॉर्मन्स स्टडीजच्या एमएच्या अंतिम सत्राच्या परीक्षेला बसण्यासाठी दंड भरावा लागेल.

    याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी असोसिएशनच्या उपाध्यक्षा असलेल्या नेहाने म्हटले आहे की यू ट्यूबवर पदवीप्रदान समारंभाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना अनेक विद्यार्थ्यांनी याच प्रकारच्या कॉमेंट केल्या होत्या. परंतु, आपण एकट्या पडलो. इतर कोणालाही कारणे दाखवा नोटीस मिळाली नाही.

    अनेक वेळा विचारणा करूनही, त्यांनी कोणाकडे तक्रार केली ते सांगितले नाही, किंवा मला कोणत्या दंडात्मक कारवाई केली गेली आहे हे मला सांगण्यात आले नाही. आंबेडकर विद्यापीठातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांवरील अन्याय दिल्ली सरकारने त्वरित थांबवावे आणि लोकशाही मार्गाने भावना व्यक्त केल्याबद्दल विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी कारवाई केली पाहिजे.

    The student was fined Rs 5,000 for criticizing Arvind Kejriwal and warned her not to sit for the exam

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य