विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. The status of Marathi as an elite language Get it in the coming Marathi language daySupriya Sule’s demand in Lok Sabha
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. साहित्य अकादमीकडेही याबाबत सात वर्षांपूर्वीच शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले.
काही वर्षांपुर्वी तत्कालिन केंद्रीय मंत्र्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या आठवड्याच विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनीही राज्यसभेत तेच उत्तर दिले. जगभरातील लाखो लोक मराठी भाषेवर प्रेम करतात. अनेक साहित्यिक या भाषेत होऊन गेले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत कितीतरी संतांची ही भाषा आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असलेल्या २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभर मराठी भाषा दिन साजरा केला जातो. हे सर्व लक्षात घेऊन याच महिन्यात येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात यावी अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.
The status of Marathi as an elite language Get it in the coming Marathi language daySupriya Sule’s demand in Lok Sabha
महत्त्वाच्या बातम्या
- Hijab Controversy : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सांगितली हिजाब घालण्यास नकार देणाऱ्या महिलेची कहाणी
- आसामचे मुख्यमंत्री विश्वशर्मांचे मानसिक संतुलन बिघडले; त्यांच्यावरच्या उपचाराचा खर्च काँग्रेस करेल; नाना पटोलेंचा टोला
- Congress Rent Controversy : सोनिया गांधी निवासस्थानाचे-काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाचे लाखो रुपयांचे भाडे थकित ; अद्याप केंद्र सरकारने कारवाई का केली नाही ?
- मोठी बातमी : उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी म्हणाले – नवीन सरकार बनताच समान नागरी संहितेसाठी एक समिती स्थापन करणार