• Download App
    आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांची घोषणा The State will have a new independent Department of Indigenous Faith and Culture: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma

    आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांची घोषणा

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी – आसाममध्ये सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावला आहे. लोकसंख्या नियंत्रण हा विषय त्यांनी राज्याच्या टॉप अजेंड्यावर आणला आहे. तसाच आसामी संस्क़ृतीचा विषय देखील त्यांनी टॉप अजेंड्यावरच ठेवला आहे. The State will have a new independent Department of Indigenous Faith and Culture: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma

    हेमंत विश्वशर्मा यांनी आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय (new independent Department of Indigenous Faith and Culture) स्थापण्याची घोषणा केली आहे. आसाममध्ये निपजलेले धर्मपंथ आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनाचे काम हे मंत्रालय करणार आहे.



     

    आसाममध्ये बांगलादेशातून मोठया प्रमाणावर घुसखोरी झाली आहे. त्यामुळे मूळ आसामींच्या लोकसंख्येला धक्का बसला आहे. त्याच बरोबर मेघालय, नागालँड या राज्यांशी देखील काही ठिकाणी सीमावाद आहे. या राज्यांशी आसामची चर्चा सुरू आहे. आम्ही संवादासाठी खुल्या दिलाने तयार आहोत. पण आसामच्या जमिनीवर आम्ही कोणाला अतिक्रमण करू देणार नाही, असे हेमंत विश्वशर्मा यांनी स्पष्ट केले.

    एकीकडून बांगलादेशी मुसलमान आणि दुसरीकडून नागालँडमधले मिशनरी यांचे दुहेरी अतिक्रमण आसामवर होते आहे. परिणामी आसामचे लोकसंख्या संतुलन बिघडले आहे. मूळ आसामी वंशाची लोकसंख्या या अतिक्रमण करणाऱ्यांपुढे कमी झाली आहे, याकडे हेमंत विश्वशर्मा यांनी लक्ष वेधले आहे.

    The State will have a new independent Department of Indigenous Faith and Culture: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र