• Download App
    लतादीदींच्या निधनाचा दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात उद्या (सोमवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीरThe state will declare a public holiday tomorrow (Monday)

    लतादीदींच्या निधनाचा दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात उद्या (सोमवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.The state will declare a public holiday tomorrow (Monday)

    या संदर्भात सरकारने काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कलाविश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

    या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.

    लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रीय दुखवट्याअंतर्गत ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.

    Paid my last respects to Lata Didi in Mumbai.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते