• Download App
    दलित शेतमजूराच्या हत्येनंतर 'फुरोगाम्यां'मध्ये 'इतना सन्नाटा क्यों है भाई?' । The so-called progressives and political parties politicizing the Lakhimpur incident, however, are pin-drop silent on Singhu lynching. Nobody dares to talk even Nihang who surrendered says 'no regrets'.

    दलित शेतमजूराच्या हत्येनंतर ‘फुरोगाम्यां’मध्ये ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’

    उत्तरप्रदेशातील शेतकरी आंदोलनात जीप घुसून झालेल्या घटनेचे राजकारण करणारे देशातले तथाकथीत पुरोगामी आणि राजकीय पक्ष सिंघू येथील दलित शेतमजूराच्या क्रूर हत्येनंतर मात्र मिठाची गुळणी धरुन बसले आहेत. अवघ्या पस्तीस वर्षाच्या या दलित शेतमजूरावर तीक्ष्ण शस्त्राचे दहापेक्षा अधिक वार करण्यात आले, त्याचे हात तोडण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याला मारल्यानंतर त्याचा मृतदेह जाहीरपणे बँरिकेडला लटकावण्यात आला. मात्र या संदर्भात कोणीच बोलायला तयार नाही. The so-called progressives and political parties politicizing the Lakhimpur incident, however, are pin-drop silent on Singhu lynching. Nobody dares to talk even Nihang who surrendered says ‘no regrets’.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गेल्या अकरा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या तीन शेतकरी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन चालू आहे. या आंदोलनस्थळी शुक्रवारी पंजाबातील तरण तारण जिल्ह्यातल्या एका पस्तीस वर्षाच्या दलित शीख मजूराची हत्या करण्यात आली. त्याच्या मृतदेहाची विटंबना करत तो आंदोलनस्थळी असलेल्या स्टेजजवळच्या बॅरिकेडला लटकावण्यात आला. एवढा संतापजनक प्रकार घडल्यानंतरही त्या विरोधात बोलण्याचे धाडस देशातील कथित पुरोगामी, मानवतावादी आणि राजकीय पक्षांनी दाखवलेले नाही.

    हत्या करण्यात आलेल्या दलित शीख मजूराने शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिबचा अवमान केल्याचा आरोप आहे. या आरोपावरुन निंहग या शीख धार्मिक गटाने त्याची हत्या केली. निळे कपडे आणि तलवार ही या गटाची ओळखीची खूण सांगितली जाते. याच निळ्या कपड्यांमध्ये या गटाच्या काही लोकांनी माध्यमांसमोर येत या क्रूर हत्येची कबुली दिली. एवढेच नव्हे तर आमच्या पवित्र ग्रंथाचा कोणी अवमान करेल तर त्याला याच पद्धतीने पुढेही शिक्षा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. दलित मजूराच्या हत्येविषयी जराही पश्चाताप नसल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.



    संबंधित दलिताच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे दहा वार करण्यात आले. त्याचे हात तोडण्यात आले. त्यानंतर इतरांवर दहशत पसरवण्यासाठी त्याचा मृतदेह आंदोलन स्थळी असलेल्या बॅरिकेडला लटकावण्यात आला. या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चानेही बोटचेपी भूमिका घेतली आहे. आंदोलनात असलेल्या निहंग या शीख धार्मिक गटाचा आणि हत्या झालेल्या तरुणाचा आमच्याशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा अतिरेकी निहंग गट आंदोलनाचा भाग आहे की नाही यावर त्यांनी सोईस्कर मौन पाळले.

    लखीमपूर घटनेनंतर सोशल मीडियात तुटून पडणाऱ्या कथित पुरोगामी मंडळींना आणि मानवतावादी गटांनाही दलित मजुराच्या हत्येवर बोलण्यास सवड मिळालेली नाही. शीख धर्मियांचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून या क्रूर हत्येकडे डोळेझाक केली जात आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांनीही या घटनेवर सोईस्कर मौन पाळले आहे. वास्तविक निहंग गटाने या हत्येची जाहीरपणे कबुली तर दिलीच आहे, शिवाय भविष्यातही अशा हत्या होऊ शकतात असे खुले आव्हानही दिले आहे. मात्र शीख समाजाच्या दहशतीपुढे तथाकथीत पुरोगामी गप्प असल्याचे दिसत आहे.

    तिकडे हत्या झालेल्या दलित तरुणाच्या कुटुंबात आक्रोश चालू आहे. शेतात मजूरी करणारा हा तरुण अवघ्या पस्तीस वर्षांचा होता. तो गुरु ग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथाचा अवमान करुच शकत नाही, असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र त्यांचे अश्रू पुसण्याचे धाडस आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने दाखवलेले नाही. उलट हत्या झालेल्या तरुणाचा किसान मोर्चाशी काहीही संबंध नाही असे म्हणत त्यांनी अंग काढून घेतले आहे.

    The so-called progressives and political parties politicizing the Lakhimpur incident, however, are pin-drop silent on Singhu lynching. Nobody dares to talk even Nihang who surrendered says ‘no regrets’.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य