• Download App
    वाहनांचा अपुरा पुरवठा आणखी वर्षभर; उद्योग जगतातील तज्ज्ञांकडून अंदाज । The shortage of vehicles will continue throughout the year; Predictions expressed by industry experts

    वाहनांचा अपुरा पुरवठा आणखी वर्षभर; उद्योग जगतातील तज्ज्ञांकडून अंदाज

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सणांच्या मुहूर्तावर होणाऱ्या वाहनांच्या उलाढालीस सेमीकंडक्टरच्या (चिप्स्) वैश्विक टंचाईचा फटका बसत आहेत. २०२२च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत सेमीकंडक्टरच्या टंचाईचा अंदाज ‘गार्टनर’ या अमेरिकतील संशोधन व सल्लागार संस्थेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आणखी वर्षभर तरी मागणीच्या तुलनेत वाहन टंचाई कायम राहणार आहे. The shortage of vehicles will continue throughout the year; Predictions expressed by industry experts

    सेमीकंडक्टरच्या बाबतीत अनेक देशांप्रमाणे भारत अवलंबून आहे. तैवान, दक्षिण कोरिया या दोन देशांचा सेमीकंडक्टर चिप्स उत्पादनातील वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्यानंतर अमेरिका, जपान, युरोप, चीन यांचा क्रमांक लागतो. कोरोनाकाळात अमेरिका व चीनमधील व्यापार संघर्ष, तैवानमधील उत्पादनात झालेली घट यांसह विविध कारणांनी सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसला आहे. अत्याधुनिक वाहने या सेमीकंडक्टरशिवाय निर्माण होऊ शकत नाहीत. त्यामुळे भारतातील अनेक वाहन कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्याचा फटका आता वाहनविक्रीवर होत आहे.

    वाहनांसाठी बुकिंग करूनही ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. स्थानिक पातळीवरील वाहनविक्री करणारे व्यावसायिकही हैराण झाले आहेत. वाहनांच्या किमतीवरही या चिप्स टंचाईचा मोठा परिणाम झाला.



    सेमीकंडक्टर चिप्स म्हणजे काय?

    स्वयंचलित गोष्टी ज्याठिकाणी आहेत तिथे ही इलेक्ट्रॉनिक्स् चिप्स वापरली जाते. संगणक, टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीज यांसह आत्याधुनिक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह वाहनांसाठी हे सेमीकंडक्टर आता अविभाज्य भाग बनले आहे.

    उत्पादन कोठे आणि उपयोग कोठे ?

    तैवान, दक्षिण कोरिया या दोन देशांचा सेमीकंडक्टर चिप्स उत्पादनातील वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल अमेरिका, जपान, युरोप, चीन यांचा क्रमांक लागतो.आधुनिक वाहनांत आता इंधन नियंत्रण, स्पीडो मीटर, रिमोट लॉक, सेंट्रल लॉक, सेन्सर अशा अनेक गोष्टींसाठी हे चिप्स वापरले जाते.

    The shortage of vehicles will continue throughout the year; Predictions expressed by industry experts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!