देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६१३ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १०३ दिल्लीमधील आहेत. इंडीयन मेडीकल असोसिएनने (आयएमए) ही यादी जाहीर केली आहे.The second wave of corona killed 513 doctors across the country, with 103 in Delhi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६१३ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १०३ दिल्लीमधील आहेत. इंडीयन मेडीकल असोसिएनने (आयएमए) ही यादी जाहीर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव आणि आयएमए यांच्यात वाद सुरू आहे. अॅलोपॅथी उपचारांवर बाबा रामदेव यांनी प्रश्न विचारले होते. आयएमएने त्यावर विरोध केल्यावर बाबा रामदेव यांनी माफी मागितली;
मात्र आयएमएला २५ प्रश्न विचारले. यामध्ये अॅलोपॅथीचा उपचार घेत असून डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू का झाला, असे विचारले होते. या पार्श्वभूमीवर आयएमएने कोरोनाने मृत्यू झालेल्यांची यादी जाहीर केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू दिल्लीमध्ये झाले. दिल्लीमध्ये १०३ डॉक्टरांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. यापाठोपाठ बिहारमध्ये ९६ डॉक्टरांचा मृत्यू झला. उत्तर प्रदेशात ४१ डॉक्टरांनी प्राण गमावले.
गुजरातमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रत्येकी २९ मृत्यू झाले. राज्यवार डॉक्टरांचा मृत्यू झालेल्यांची संख्या पुढीलप्रमाणे : आसाम- ६, छत्तीसगड-३, राजस्थान -३९, तेलंगणा -२९, तामीळनाडू -१८, महाराष्ट्र -१५, मध्य प्रदेश -१३, ओडिशा -१६, गोवा -२, हरियाणा -७, जम्मू आणि काश्मीर – ३, कर्नाटक-८, केरळ- ४, त्रिपुरा -२, उत्तराखंड-२, पश्चिम बंगाल -१९.
The second wave of corona killed 513 doctors across the country, with 103 in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजी महाराजांची बदनामी, कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी धाडस केले, नारायण राणे यांचा सवाल
- कॉंग्रेसने मागासवर्गीयांनाच मते मागावीत, मराठ्यांकडे येऊ नये, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
- पहाडासारखा पैलवान पोलीस कोठडीत ढसाढसा रडला, सुशील कुमारला पोलीसांनी दाखविला खाक्या
- हिंदू राहतात त्याठिकाणी गोमांस वर्ज्य, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे आश्वासन
- सर्वाधिक फटका बसलेल्या उद्योगांना पॅकेज देण्याची सरकारची तयारी, अर्थव्यवस्थेत सुधारणेसाठी होणार निर्णय