प्रतिनिधी
नवी दिल्ली : फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत. केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार करत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. सरकारने अलीकडेच कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 38 % दराने डीए मिळतो. The salary of central government employees will increase once again
आता केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर अंतर्गत किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे, ते 26 हजार रुपये करण्याची मागणी केली जात आहे. यंदा फिटमेंट फॅक्टरबाबत कोणताही निर्णय घेणे अवघड असले तरी पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
International Yoga Day 2022: ITBPच्या जवानांनी 17 हजार फूट उंचीवर बर्फात केला योगाभ्यास
…तर मूळ पगार 26 हजार होईल
केंद्र सरकारने जर फिटमेंट फॅक्टर 3.68 % पर्यंत वाढवले तर कर्मचा-यांचे मूळ वेतन 26 हजार रुपये होईल. सध्या किमान मूळ वेतन 18 हजार रुपये आहे . तथापि, सरकार किमान मूळ वेतन 21 हजार रुपये करण्याचा विचार करत आहेत. केंद्रीय मंत्रिमडंळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या. एन्ट्री लेव्हल बेसिक वेतन दरमहा, 7 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये करण्यात आले आहे. तर सर्वोच्च स्तर म्हणजेच सचिवांचे वेतन 90 हजार रुपयांवरुन 2.5 लाख रुपये करण्यात आले. सरकारने यापूर्वी 2017 मध्ये एंट्री लेव्हल मूळ पगार 7 हजार प्रति महिन्यावरुन 18 हजार रुपये केले होते.
The salary of central government employees will increase once again
महत्वाच्या बातम्या
- सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेची शपथ!!
- पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे
- बेस्ट, सिटी बसप्रमाणे एसटीचे ही कळणार लाईव्ह लोकेशन; लवकरच अॅपमध्येही सुविधा
- महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार; सुरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती
- राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री