विशेष प्रतिनिधी
उज्जैन: रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षाच्या माळा घालण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वेटर संतांच्या वेशात लोकांना जेवण वाढताना आणि खरकटी भांडी उचलताना दिसत आहेत. यावरुनच साधू-संतांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा हिंदू संस्कृती आणि संतांना अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.The sage-saints objected to the waiters wearing saffron clothes in the Ramayana special train
ट्रेन वेटर्सनी इतर कुठलेतरी कपडे घातले पाहिजेत अशा मागणीचे पत्र उज्जैनमधील संतांनी रेल्वेमंत्र्यांना लिहील आहे. 12 डिसेंबरपासून सुरू रेल्वेच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी कपडे बदलावे अन्यथा रेल्वे रोको केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आखाडा परिषदेचे माजी सरचिटणीस परमहंस अवधेश पुरी महाराज यांनी वेटर्सचा पेहराव लवकरात लवकर बदलावा, अन्यथा 12 डिसेंबरला सुटणाºया पुढील ट्रेनविरोधात हजारो हिंदूंच्यावतीने संत समाज आंदोलन करेल आणि रेल रोको केले जाईल, असे म्हटले आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरुन धावणाºया या ट्रेनचा अयोध्या हा पहिला थांबा आहे. येथून धार्मिक यात्रा सुरू होते. अयोध्येतील प्रवाशांना नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी मार्गे रस्त्याने नेपाळला नेले जाते. यानंतर प्रवाशांना रेल्वेने भगवान शिवाची नगरी काशी येथे नेले जाते.
येथून बसने सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूटसह काशीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेले जाते.चित्रकूटहून ही गाडी नाशिकला पोहोचते, जिथे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले जाते. नाशिक ते किष्किंधा शहर हंपी पर्यंत, जिथे श्री हनुमानाचे जन्मस्थान अंजनी पर्वतावर आहे आणि भेट दिली जाते.
या ट्रेनचा शेवटचा थांबा रामेश्वरम आहे, जिथे तुम्ही धनुषकोटी पाहू शकता. रामेश्वरमहून धावणारी ही ट्रेन 17व्या दिवशी परतते. तुम्ही रेल्वे आणि रस्ते प्रवासाचा समावेश केला तर हा प्रवास 7500 किमीचा आहे.खास तयार केलेले ट्रेनचे डबे धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी देखो अपना देश या उपक्रमांतर्गत रामायण सर्किट एक्सप्रेस ट्रेन चालवली जाते.
या डीलक्स एसी टुरिस्ट ट्रेनद्वारे भगवान श्री रामाशी संबंधित सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातात.रामायण एक्सप्रेसची खास रचना करण्यात आली आहे. एसी कोच गाड्यांमध्ये बाजूचे बर्थ काढून आरामदायी खुर्ची-टेबल बसवण्यात आले आहेत.
स्वतंत्र प्रसाधनगृहही बांधण्यात आले असून, त्यात आंघोळीचीही सोय आहे. ट्रेनमध्ये दोन जेवणासाठी दोन डायनिंग कोचदेखील आहेत.12 डिसेंबरला पुढील ट्रेन ट्रिपरामायण एक्स्प्रेसचा पुढील प्रवास 12 डिसेंबरला सुरू होणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आॅनलाइन बुकिंग करता येईल.
The sage-saints objected to the waiters wearing saffron clothes in the Ramayana special train
महत्त्वाच्या बातम्या
- ओवेसींचा सीएए, एनआरसी कायदे रद्द करण्यासाठी विषारी इशारा, अन्यथा आणखी एक शाहीन बाग
- अॅमेझॉन नाही ही तर गांजा कंपनी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा आरोप
- प्रति ताजमहाल! बुरहानपूर मधील नागरिकाने आपल्या पत्नीसाठी गिफ्ट म्हणून ताजमहल सारखेच दिसणारे घर बांधले
- काँग्रेस नेत्यांच्या सॉफ्ट हिंदुत्वावर खासदार मनीष तिवारींचा वार; काँग्रेसच्या राजकारणाचा आधार धार्मिक नाही, हे नेत्यांना समजत नाही!!