• Download App
    दरोडेखोरांना अवघ्या अडीच तासात अटक, थरारक पाठलाग ; गोव्यामध्ये चोरलेले २९ मोबाईलही जप्त|The robbers were arrested in just two and a half hours; 29 mobile phones stolen in Goa seized

    दरोडेखोरांना अवघ्या अडीच तासात अटक, थरारक पाठलाग ; गोव्यामध्ये चोरलेले २९ मोबाईलही जप्त

    वृत्तसंस्था

    सिंधुदुर्ग : ओरोस येथील सिद्धी पेट्रोलपंपावर आज पहाटे साडेसहा वाजता दरोडा घालून ५७ हजारांची रक्कम लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अवघ्या अडीच तासांत अटक केली.The robbers were arrested in just two and a half hours; 29 mobile phones stolen in Goa seized

    एसपी दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकूण ५ आरोपीना अटक करण्यात आली असून दरोड्यातील रक्कम ५७ हजार सह मोबाईल व कार मिळून सुमारे ९ लाखांचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला आहे.



     

    जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दरोड्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात नाकाबंदी करत अलर्टचा आदेश दिला होता. त्यानुसार वैभववाडी पोलिस निरिक्षक अतुल जाधव हे स्वतः सहकारी पोलिसांसह करूळ चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची कसून झडती घेत होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दरोड्यातील संशयित कार ( MH -04 – KF – 2748 ) वैभववाडीत संभाजी चौकात आली.

    न थांबता सुसाट कोल्हापूरच्या दिशेने पळाली. मात्र, पोलिसांनी थरारक पाठलाग करत कारला करूळ चेकपोस्ट येथे गाठून पाचही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. अब्दुल रजाक, मीर बादशहा शेख, सोहेल युनूस काझी, प्रमोद प्रकाश गायकवाड, चालक राजेश गुणाजी मासवकर अशी पाचही आरोपींची नावे आहेत.

    ते घाटकोपरहुन भाड्याच्या कारने ३१ डिसेंबरला गोव्याला गेले होते. गोव्यात २९ मोबाईल हातोहात लांबवले. ओरोसला सिद्धी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने आले. पंपाच्या मॅनेजरने ठेवलेली हिशोबाची ५७ हजार रुपये अब्दुल रजाकने लंपास केले आणि कारसह सर्वांनी पोबारा केला.

    दरोड्याची घटना पोलिसांना समजताच एसपी दाभाडे यांनी लागलीच जिल्ह्यात नाकाबंदी केली. आणि दरोड्याच्या घटनेनंतर अवघ्या अडीच तासांत दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

    The robbers were arrested in just two and a half hours; 29 mobile phones stolen in Goa seized

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही