नाशिक : राष्ट्रपतींनी आज 4 महनीय व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती केली असली, तरी खऱ्या अर्थाने राज्यसभा निवडणुकीतली चुरस पुढच्या वर्षी 2026 मध्ये होणार आहे कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये शरद पवार, एच. डी. देवेगौडा, दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काही केंद्रीय मंत्री देखील पुढच्या वर्षी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्त होण्यामुळे राज्यसभेतला ज्येष्ठांचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता आहे.
2026 मध्ये राज्यसभेच्या एकूण 73 जागा रिक्त होत आहेत. पण यातल्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, रवनीत सिंग बिट्टू, रामदास आठवले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान, भाजपचे खासदार भागवत कराड, धैर्यशील पाटील, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील यांचा समावेश आहे याखेरीज अन्य पक्षांचे वरिष्ठ नेतेही निवृत्त होणार आहेत.
महाराष्ट्रातून एकूण 7 खासदार निवृत्त होणार असून महाराष्ट्र विधानसभेचे संख्याबळाचे गणित पाहता शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी यांना राज्यसभेत एन्ट्री मिळण्याची शक्यता नाही. स्वतः शरद पवार 2 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होणार असल्याने ते पुन्हा राज्यसभेसाठी उभे राहणार का आणि ते उभे राहिले तर त्यांच्या मतांसाठी भाजप मदत करणार का??, हे सवाल उपस्थित होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातले राजकीय गुळपीठ पाहता भाजप कदाचित पवारांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, पण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कुठल्याही उमेदवाराला पाठिंबाही देणार नाही. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संसदेतली ताकद कमी होणार आहे.
त्याचबरोबर शिवसेनेची ताकदही घटणार आहे. भाजप रामदास आठवले यांना पुन्हा निवडून आणेल का??, याविषयी दाट शंका आहे. महाराष्ट्रातले काँग्रेसचे घटलेले संख्याबळ लक्षात घेता त्यांच्या पक्षाचा खासदार राज्यसभेवर येथून निवडून जाणे कठीण आहे. त्यामुळे 2026 मध्ये भाजप राज्यसभेवर स्वतःची ताकद वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून कमीत कमी पाच खासदार तरी निवडून पाठवेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे इतर कुठल्याही पक्षांना फार मर्यादित संधी मिळायची शक्यता आहे.
– वयोवृद्ध नेते पुन्हा उभे राहणार?
कर्नाटक मध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तिथून मल्लिकार्जुन खर्गे पुन्हा राज्यसभेवर निवडून येऊ शकतात, पण काँग्रेस दिग्विजयसिंह यांना पुन्हा तिकीट देईल की ते कापेल??, याविषयी आत्ताच भाकीत करणे कठीण आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे भाजपच्या सहाय्याने पुन्हा राज्यसभेत येण्याची शक्यता आहे. अर्थात मल्लिकार्जुन खर्गे – वय 83, देवेगौडा – वय 93 आणि शरद पवार – वय 86,
हे आता वयोवृद्ध झाल्याने मूळातच राज्यसभा निवडणुकीसाठी उभे राहतील का??, त्याविषयी सर्वांना दाट शंका आहे. भाजप कदाचित शरद पवार यांच्यासाठी एका जागेचा “राजकीय त्याग” करेल, पण शरद पवारांनी आपल्याला पर्याय म्हणून दिलेल्या उमेदवारासाठी तसाच “त्याग” करेल का??, याविषयी आत्ताच अटकळ बांधणे कठीण आहे.
The real battle for Rajya Sabha elections 2026
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर लँडिंग करण्यासाठी नवी मुंबईहून टेक ऑफ!!
- आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळाला 35 कोटी रुपये उत्पन्न
- Chandrachud : वन नेशन-वन इलेक्शन विधेयक संविधानाविरुद्ध नाही; चंद्रचूड यांनी संसदीय समितीला सांगितले- ECच्या अधिकारांवर चर्चेची गरज
- Bangladesh : बांगलादेश लष्कराचा कट्टरपंथी पक्षांना पाठिंबा; हसीना यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानातून गायब