प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्राप्तीकर विभागाने मुंबईतील दोन बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशीसंबंधित काही व्यक्ती/संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्तीची कारवाई केली. 7 ऑक्टोबर रोजी शोध मोहीमेला सुरुवात झाली आणि मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमधील सुमारे 70 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.The raids by the Income Tax Department in Maharashtra revealed unaccounted income of Rs 184 crore.
या कारवाईत मिळालेल्या पुराव्यांमधून प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. आक्षेपार्ह कागदपत्रे, दोन समूहांचे सुमारे 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे सापडले आहेत.
या शोध कारवाईमुळे या व्यावसायिक गटांनी विविध कंपन्यांचे जाळे निर्माण करूनव्यवहार केल्याचे आढळून आले आहे जे प्रथमदर्शनी संशयास्पद आहेत.
निधीच्याप्रवाहाचे प्राथमिक विश्लेषण सूचित करते की बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी आगाऊ रक्कम, अस्तित्वात नसलेल्या वादातूनलवाद सौदे, यासारख्या विविध संशयास्पद मार्गाने बेहिशेबी निधी जमवण्यात आला आहे.
संशयास्पद पद्धतीने जमवण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्याअधिग्रहणासाठी केला गेला आहे. यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय इमारत, दिल्लीतील आलिशान परिसरातील फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रातील शेतजमिनी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक यांचा समावेश आहे. या मालमत्तांचेमूल्य सुमारे 170 कोटी रुपये आहे. 2.13 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 4.32 कोटी रुपयांचे दागिने जप्तकरण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
The raids by the Income Tax Department in Maharashtra revealed unaccounted income of Rs 184 crore.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजी भिडेंच वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले – निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान
- भारताच्या संरक्षणाची “सप्तशक्ती”; 7 नव्या कंपन्या ठरतील भारताच्या सैन्यशक्तीचा मजबूत पाया
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- Elgaar Parishad case : वरवरा राव यांना 28 ऑक्टोबरपर्यंत सरेंडर करण्याची गरज नाही – मुंबई उच्च न्यायालय