• Download App
    हैतीतील प्रलयंकारी भूकंपामध्ये ७०० जणांचा बळी २८०० जण जखमी; आता चक्रीवादळाचा धोका। The quake in Haiti has so far killed more than 700 civilians and injured 2,800

    हैतीतील प्रलयंकारी भूकंपामध्ये ७०० जणांचा बळी २८०० जण जखमी; आता चक्रीवादळाचा धोका

    वृत्तसंस्था

    पोर्ट : अउ-प्रिंस: कॅरेबियन देश हैतीतील प्रलयंकारी भूकंपात अनेक शहरांचं मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत ७२५ नागरिकांचा मृत्यू तर 2800 जण जखमी झाले आहेत. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीने या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती दिली. The quake in Haiti has so far killed more than 700 civilians and injured 2,800 earthquake in Haiti

    भूकंपामुळे जेरेमी, लेस केयस, सेंट लुइस डू सूद आणि लेस एंग्लिस या शहरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरे जमीनदोस्त झाल्यामुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे.

    चक्रीवादळाचे संकट घोंगावतेय

    कोरोनामुळे त्रस्त झालेल्या हैतीच्या नागरिकांची चिंता भूकंपाने आणखी वाढली आहे. भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून १२५ किलोमीटरवर होतं. दरम्यान, चक्रीवादळ ग्रेस सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत हैतीला पोचणार आहे, त्यामुळे नागरिकांन नव्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.



    अनेक देशांकडून मदत मिळणार

    भूकंपानं किमान ८६० घरं नष्ट केली तर ७००हून अधिक घरांचे नुकसान झालं आहे. रुग्णालये, शाळा, कार्यालये आणि चर्चेसही प्रभावित झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी यूएसएआयडी प्रशासक समंथा पॉवर यांची हैतीला अमेरिकेच्या मदतीसाठी समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली आणि अनेक देशांनी मदती करण्याची तयारी दाखवली आहे.

    The quake in Haiti has so far killed more than 700 civilians and injured 2,800

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट