• Download App
    पंतप्रधानांनी केले भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा|The Prime Minister lauded the various initiatives of Bhandarkar Oriental Studies Research Institute

    पंतप्रधानांनी केले भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुण्यातील प्राच्यविद्या क्षेत्रात जागतिक कीतीर्ची संशोधन संस्था अशी मान्यता पावलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.The Prime Minister lauded the various initiatives of Bhandarkar Oriental Studies Research Institute

    मन की बात या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्या प्रिय देशवासियांनो अशातच माझे लक्ष एका लक्षवेधी प्रयत्नाकडे गेले. हा प्रयत्न आपले प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय बनवण्याचा आहे. पुण्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे.



    या संस्थेत परदेशातील लोकांना महाभारताच्या महत्वाची ओळख करून देण्यासाठी ऑनलाईन कोर्स सुरू करण्यात आला आहे. तुम्ही हे जाणल्यानंतर थक्क व्हाल, हा कोर्स भलेही आता सुरू केला गेला आहे मात्र यामध्ये जे शिकवलं जातं, ती माहिती गोळा करण्याची सुरूवात १०० वर्षांपेक्षाही अगोदर झाली होती.

    जेव्हा संस्थेने याच्याशी निगडीत अभ्यासक्रम सुरू केला, तेव्हा त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मी या जबरदस्त प्रारंभाची चर्चा यासाठी करतोय, कारण लोकांना माहिती व्हावी की आपल्या परंपरेच्या विविध पैलूंना कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने सादर केले जात आहे. सातसमुद्रापार बसलेल्या लोकांना याचा लाभ कसा मिळेल, यासाठी देखील नवनवीन पद्धतींचा अवलंब केला जात आहे.

    पंतप्रधान मोदींचे हे उद्गार आमच्यासाठी निश्चितच प्रेरणादायक आणि आगामी उपक्रमांसाठी उत्साह वाढवणारे आहेत. सादर प्रणाम व धन्यवाद! अशा शब्दांमध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटच्यावतीने मोदींनी केलेल्या प्रशंसेवर प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे.

    The Prime Minister lauded the various initiatives of Bhandarkar Oriental Studies Research Institute

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य