विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : १२-१४ वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेवॅक्सची, Corbevax किंमत खाजगी रुग्णालयात ९९० प्रति डोस असेल. सरकारी सुविधांमध्ये १४५ प्रति डोस मिळेल. The price of Corbevax is 990 per dose in a private hospital
देशात १२ ते १४ वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे. पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी २८ दिवसांचे अंतर असेल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही लस ९० टक्के प्रभावी असल्याची माहिती आहे.
सर्व राज्यांना पत्र
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी मुलांच्या लसीकरणाबाबत सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटल्याप्रमाणे, १६ मार्च पासून १२-१४ वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण सुरू झाले आहे. १२-१३ आणि १३-१४ वयोगटातील मुलांसाठी फक्त ‘कॉर्बेवॅक्स वॅक्सीन’ वापरली जाईल.