विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणातील कुस्तीगीर आंदोलनात काँग्रेस सह बाकीच्या पक्षांचे नेते घुसल्यानंतर त्या मूळ आंदोलनाचा पुरता विचका झाला आहे. प्रियांका गांधी, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, त्यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा, कम्युनिस्ट नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे पण त्यानेच आंदोलनाला राजकीय वळण लावून पुरता विचका केला आहे.The political ramifications of the Kustigir movement; Priyanka followed by Robert Vadra’s entry; Rejection of Brajbhushan Singh’s resignation
आता तर त्या आंदोलनात प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांचीही एंट्री झाल्यानंतर कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांनी थेट राजीनामा द्यायलाच नकार दिला आहे. खेळाडूंनी आपला सराव सुरू करावा. उगाच आंदोलनात वेळ घालवू नये. आपले जे काही भांडण आहे ते सोडवायला कोर्ट आणि पोलीस पुरेसे आहेत, अशा शब्दांत ब्रजभूषण सिंह यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापैकी कोणी राजीनामा द्यायला सांगितले तरच आपण राजीनामा देऊ, असे ब्रजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
दीपेंद्र हुड्डा विरुद्ध ब्रजभूषण खरी लढाई
2011 मध्ये याच ब्रजभूषण सिंह यांनी दीपेंद्र हुड्डा यांचा कुस्तीगीर महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव करून ते निवडून आले. या अध्यक्षपदाची मुदत 12 वर्षांची आहे. त्यामुळे यंदा निवडणुका अपेक्षितच आहेत. कुस्तीगीर महासंघावर अनेक वर्षे हरियाणातील राजकारण्यांचे वर्चस्व होते. ते मोडून काढून उत्तर प्रदेश मधले ब्रजभूषण सिंह अध्यक्ष झाले आणि त्यातही 2014 नंतर ते भाजपचे खासदार झाले.
कुस्तीगीर महासंघात आता काँग्रेस विरुद्ध भाजप असा देखील हा राजकीय सामना आहे. त्यामुळेच हरियाणातील कुस्तीगीर विनेश फोगट, साक्षी मलिक वगैरे कुस्तीगीरांच्या आंदोलनात दीपेंद्र हुड्डा आणि भूपिंदर सिंह हुड्डा सामील झाले. त्यानंतर प्रियांका गांधी अरविंद केजरीवालांची पण एंट्री झाली. कम्युनिस्ट नेत्यांनी परस्पर पाठिंबा देऊन ते मोकळे झाले आणि रॉबर्ट वड्रांनी देखील कुस्तीगीरांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. पण नेमका त्यामुळेच या कुस्तीगीरांच्या आंदोलनाचा पुरता राजाकीय विचका झाला आहे आणि ब्रजभूषण सिंह यांनी आता राजीनामा द्यायला नकार दिला आहे.
The political ramifications of the Kustigir movement; Priyanka followed by Robert Vadra’s entry; Rejection of Brajbhushan Singh’s resignation
महत्वाच्या बातम्या
- ” उबाठाचा प्रवास ‘ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे’ असल्याने भविष्यात…” आशिष शेलारांनी लगावला टोला!
- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 317 तालुक्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाचा प्रारंभ
- LPG सिलिंडर आज 171.50 रुपयांनी झाला स्वस्त, जाणून घ्या दिल्ली ते चेन्नईचे नवे दर
- ऑनलाईन प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट; ‘ISI’च्या षडयंत्रात अडकलेल्या विद्यार्थ्याला हेरगिरीच्या आरोपात जावे लागले तुरुंगात!