वृत्तसंस्था
हैदराबाद : संघाचे लोक एवढे खराब नाहीत ममतांनी एक विधान काय केले आणि त्यावर ओवैसींनी चिडचिड केली आहे. The people of Ghane are not that bad Mamata statement Owaisi’s irritation
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका सरकारी कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भाष्य केले आहे. संघाचे लोक एवढे खराब नाहीत. त्यांच्यातही चांगले लोक आहेत. एक दिवस ते देखील मोदी सरकार विरुद्ध उठाव करतील, असा मला विश्वास वाटतो, असे वक्तव्य त्यांनी नुकतेच केले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या या “निवडक” संघ स्तुतीवरून एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जबरदस्त चिडचिड केली आहे. ममता बॅनर्जी या मूळातच संघाच्या पक्षपाती आहेत. त्यांना आजच संघाचा कळवळ आलेला नाही. यापूर्वी देखील त्यांनी संघाची स्तुती केली होती, असे वक्तव्य ओवैसी यांनी केले आहे. यासाठी त्यांनी 2003 चा एक दाखला दिला आहे. ममता बॅनर्जी यांना संघ “दूरचा” वाटत नव्हता आणि संघाला देखील हिंदू राष्ट्र बनवायचे असल्यामुळे त्यांना देखील ममता बॅनर्जी फारशा “दूरच्या” नाहीत. मुस्लिमांचा द्वेष हा दोघांमधला कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी संघाची स्तुती करणे स्वाभाविक आहे. तृणमूळ काँग्रेस मधले मुस्लिम नेते आता ममतांच्या संघ स्तुतीवरून देखील काही मखलाशी करतील, असा टोला खासदार ओवैसी यांनी लगावला आहे.
– 2003 मधला दाखला
2003 मध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मोहन भागवत आणि संघाचे त्यावेळचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या उपस्थितीत त्यावेळी केंद्रीय मंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी एक वक्तव्य केले होते. संघाने तृणमूळ काँग्रेसला एक टक्का जरी पाठिंबा दिला तरी पश्चिम बंगालमध्ये आम्हाला कम्युनिस्टांच्या दहशतवादाविरुद्ध लढता येईल, असे त्या म्हणाल्या होत्या. संघाचे स्वयंसेवक समाजातल्या सर्व घटकांची काळजी घेतात. ते सीमावर्ती इलाख्यामध्ये सुदूर पोहोचतात. निरपेक्षपणे काम करत राहतात, अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी संघाचे कौतुक केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा दाखला देखील असदुद्दीन ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर शरसंधान साधताना दिला आहे.
The people of Ghane are not that bad Mamata statement Owaisi’s irritation
महत्वाच्या बातम्या
- LPG Cylinder Price : LPG सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या काय आहेत दिल्ली ते मुंबईचे नवे दर?
- Rule Change From 1st September : आजपासून होणार हे 6 मोठे बदल, जाणून घ्या कसा वाढला तुमच्या खिशावरचा भार!
- Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत 117 नेते सहभागी होणार, कन्हैया कुमार आणि पवन खेरा यांचेही नाव यादीत
- अमरावतीत लव्ह जिहाद; धर्मांध मुसलमानाने फसवले उच्चविद्याविभूषित हिंदू तरुणीला!!