• Download App
    The Opposition had been saying that there is no Modi wave when there were elections in Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh

    देशात आणि महाराष्ट्रात मोदी लाट तर आहेच; पंकजा मुंडेंनी सांगितला 3 राज्यांमधला अनुभव!!

    वृत्तसंस्था

    बीड : देशात लोकसभा निवडणुकीतल्या पहिल्या तीन टप्प्यांमधल्या मतदानानंतर मोदी लाट आहे की नाही??, याविषयी सोशल मीडियात भरपूर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या बीड लोकसभा मतदार संघातल्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधला अनुभव सांगून देशात आणि महाराष्ट्रात मोदी लाट असल्याचेच स्पष्ट नमूद केले. The Opposition had been saying that there is no Modi wave when there were elections in Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh

    एएनआय वृत्तसंस्थेची बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा विरोधक मोदी लाट नसल्याचे सांगत होते. पण त्या राज्यांमधल्या जनतेने काय निकाल दिला ते आपण पाहिले आहे. तिन्ही राज्यांमध्ये भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आधीपेक्षा जास्त बहुमताने भाजपची सरकारे निवडून आली.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत की, मोदी लाट नाही. पण मी पाहिले आहे की लोक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक झलक पाहण्यासाठी येतात आणि मोदी – मोदीच्या प्रचंड घोषणा देऊन त्यांचे स्वागत करतात. मग देशात आणि महाराष्ट्रात मोदी लाट नाही असे कसे म्हणायचे??, दोन्हीकडे मोदी लाट आहेच, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

    बीड लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. तिथे मराठा आरक्षण हा विषय तापवून शरद पवारांचा राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी लाटेविषयी पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.

    The Opposition had been saying that there is no Modi wave when there were elections in Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!