• Download App
    भांडारकर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मचे आज केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन The online learning platform of Bhandarkar Institute was inaugurated today by the Union Finance Minister

    काय आहे भारत विद्या? : भांडारकर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मचे आज केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    वृत्तसंस्था

    पुणे : भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेने तयार केलेल्या भारत विद्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज होणार आहे. सीतारामन या आजपासून तीन दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. आज पहिल्या दिवशी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत आणि सिम्बॉयसिस महाविद्यालयात त्यांचे महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेने तयार केलेल्या भारत विद्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. The online learning platform of Bhandarkar Institute was inaugurated today by the Union Finance Minister

    भारत विद्या हा असा अनोखा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, की ज्यामध्ये प्राच्य विद्येचे मोफत आणि सशुल्क कोर्सेस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेने हे कोर्सेस तयार केले आहेत. कला, आर्किटेक्चर, तत्त्वज्ञान भाषा आणि विज्ञान या विषयांचे हे कोर्सेस असणार आहेत.

    यातील पहिले सहा कोर्सेस वेदविद्या, भारतीय दर्शनशास्त्र, संस्कृत भाषा, महाभारताची 18 पर्वे, फंडामेंटल्स ऑफ आर्किऑलॉजी कालिदास आणि भास याविषयीचे कोर्सेस भांडारकर राज्य विद्या संशोधन संस्थेने आधीच जाहीर केले आहेत. ते प्रथम या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहेत. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेने यासाठी जगभरातील विविध विद्यापीठे आणि संशोधन संस्थांशी करार केले आहेत.

    The online learning platform of Bhandarkar Institute was inaugurated today by the Union Finance Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा